BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Updates: आठपैकी केवळ दोनच मंत्र्यांनी स्वीकारला पदभार

खाती तर मिळाली, ताबा कधी घेणार?

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याच्या इतिहासात भाजपने सर्वाधिक बहुमत मिळवत सरकार स्थापन केले. मात्र, यावेळी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि त्यानंतरचे सोपस्कर पूर्ण करण्यात कमालीची दिरंगाई दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीमुळे तब्बल तीन महिने बंद असलेले प्रशासन आता तरी सुरू होईल अशी आशा असताना रविवारी खातेवाटपही करूनही प्रत्यक्ष मंत्री आज सोमवारी मंत्रालयाकडे फिरकलेच नाहीत. 8 पैकी केवळ दोन मंत्र्यांनी आज आपल्या कार्यालयाचा ताबा घेत कामकाजाला सुरवात केली. मंगळवारी विनायकी चतुर्थीच्या मुहुर्तावर काही मंत्री आपल्या कार्यालयात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 8 जानेवारीला लागली. 14 फेब्रुवारीला मतदान झाले. इतर राज्यांच्या निवडणुकांमुळे निकाल 10 मार्चला लागला निकालांमध्ये भाजपला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या. मात्र, नव्या सरकारचा शपथविधी ता.28 मार्चपर्यंत रेंगाळला. रविवारी 3 एप्रिल रोजी खातेवाटप करण्यात आले. आज कार्यालयीन कामकाजाचा पहिला दिवस असल्याकारणाने सर्वच मंत्री आपल्या कार्यालयाचा ताबा घेतील अशी अपेक्षा होती. पण 8 पैकी केवळ पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनीच आपल्या कार्यालयाचा ताबा घेत कामकाजाला सुरुवात केली. तर नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, मंत्री गोविंद गावडे, मंत्री रवी नाईक, मंत्री बाबुश मोन्सेरात आज मंत्रालयाकडे फिरकलेच नाहीत. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक असते. तत्पूर्वी मंत्री आपल्या कार्यालयाचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

भाजपच्या चुकीच्या राजकारभारामुळे गेली तीन महिने प्रशासन ठप्प आहे. त्यांना जनतेच्या सेवेपेक्षा मिळणाऱ्या पैशात जास्त रुची आहे. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये सरकार बनवून प्रत्यक्ष कामाचा धडाका लावला आहे. गोव्यात मात्र अजून मंत्रीच कार्यालयाकडे आले नाहीत. त्यामुळे सुरवातीलाच भाजप सरकार जनतेच्या सेवेसाठी कुचकामी ठरले आहे - वाल्मिकी नाईक, प्रवक्ते आप

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT