Minister Mavin Gudinho
Minister Mavin GudinhoDainik Gomantak

सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना पालकांना सतावू नका: गुदिन्हो

पीयुसी मिळवण्यासाठी एका महिन्याची मुदत देण्याची पोलीस व वाहतूक खात्याला सूचना देण्यात आली आहे.
Published on

गोवा: सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना दुचाकीवरून मुलांना शाळेत सोडणाऱ्या पालकांची चलन देऊन सतावणूक करू नका अशी मागणी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो (Minister Mavin Gudinho) यांनी केली. पीयुसी मिळवण्यासाठी एका महिन्याची मुदत देण्याची पोलीस व वाहतूक खात्याला सूचना देण्यात आली आहे. तसेच माणुसकीने वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. (Do not harass parents while enforcing the amended motor vehicle law statement by mavin Gudinho)

Minister Mavin Gudinho
वास्को कब्रस्तान येथे तणावाचे वातावरण; दोन कबरींचे नुकसान

गोव्यात सुधारित मोटार वाहन कायद्याची 1 एप्रिल मध्यरात्री 12 पासून कडक अमलबजावणी करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत तब्बल 27 वर्षांनी वाढ झाल्याची माहिती गोव्याचे वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी दिली होती. दंडाच्या रकमेत भरभक्कम वाढ करतानाच परवाना रद्द होणार असल्याने वाहनचालकांचं धाबं मात्र दणाणलं आहे.

सुधारित वाहन कायद्याची पेडण्यात अंमलबजावणी

सुधारित मोटर वाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली असून पेडण्यात (Pernem) वाहतूक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग 66 वर उभे राहून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली.त्यामुळे कारवाईचा धसका घेऊन हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या वाढल्याचे चित्र महामार्गावर दिसून आले.

पूर्वीच्या कायद्यापेक्षा दहापट अधिकची दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पेडणे वाहतूक पोलिस रस्त्यावर ठिकठिकाणी उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करत होते. कोणते नियम मोडले जातात, दुचाकी वाहनांवर दोघे आहेत, हेल्मेट आहे की नाही, चार चाकी वाहनामध्ये सीट बेल्ट वापरला आहे,की नाही. विमा आहे की नाही, परमिट आहे का, अशी विचारणा करून कागदपत्रांची तपासणी केली जात होती.

Minister Mavin Gudinho
Goa Corona Update : दिवसभरात 4 जणांना कोरोनाची लागण; 41 सक्रिय रुग्ण

नव्या तरतुदींची अमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून

गोवा सरकारने (Goa Government) मोटर वाहन कायदा 1998 मधील तरतुदींमध्ये जुलै 2021 मध्ये बदल केले होते. आता या नव्या तरतुदींची अमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून गोव्यात केली गेली आहे. नवी दंडाची रक्कम ही सध्याच्या रकमेपेक्षा दहापटींनी जास्त असल्याने नियम मोडल्यास वाहनचालकांना भरभक्कम दंड भरावा लागणार आहे. चालकाने वैध परवान्याशिवाय गाडी चालवल्यास किंवा परवाना नसलेली गाडी चालवल्यास तब्बल 10 हजार रुपयांचा दंड (Penalty) आकारला जाईल. तर रजिस्ट्रेशन न झालेली किंवा विमा नसलेली गाडी चालवल्यास 2000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वेगाने गाडी चालवणे, सीट बेल्ट न वापरणे, गाडी चालवताना इतरांचा जीव धोक्यात घालणे असे प्रकार निदर्शनास आल्यास त्याला 1000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसंच ट्रिपल सीट आणि विनाहेल्मेट दुचाकीवरुन फिरल्यास 1000 रुपये दंड आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com