Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: भाजप आणि अदानींचा पर्दाफाश केल्यानेच राहुल गांधींवर सूडबुद्धीने कारवाई

या कारवाईमुळे काँग्रेसच्या गोटात एकाच खळबळ माजली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

राहुल गांधीनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावरुन टीका केली होती. राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर काल (23 मार्च) त्यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले.

त्यानंतर आज लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याची कारवाई केलीय. या कारवाईमुळे काँग्रेसच्या गोटात एकाच खळबळ माजली आहे.

राहुल गांधी यांची खासदारी रद्द झाल्यानंतर देशभरात काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. तसेच इतर विरोधीपक्षातील नेत्यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.

देशभरात काँगेसने जशी आंदोलने सुरु केली असताना गोव्यात देखील काँग्रेसने पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केलाय. विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ यांनी भाजपवर आगपाखड केलीय.

ते म्हणाले "लोकशाहीसाठी आजचा हा काळा दिवस आहे, राहुल गांधींनी भाजप आणि अदानींचा पर्दाफाश केल्यानेच भाजप सरकार खवळले आहे. या सरकारच्या मुजोरीच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष आता एकवटले असून आता देशभर काँग्रेस निदर्शन करणार"

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत आपली बाजू मांडली असून लढण्याची तयारी दर्शवली आहे.

भारतासाठी लढत आहे, त्यासाठी कोणताही किंमत चुकवण्यास तयार असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांची खासदारी रद्द झाल्यानंतर देशभरात काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे.

दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता देशभर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT