Goa:  Dainik Gomantak
गोवा

Goa: ‘जुलूस’मध्‍ये फक्‍त 34 वाहने वापराची मुभा

अतिरिक्‍त जिल्‍हाधिकाऱ्यांसोबत बैठक : अटींचे पालन करण्‍याचे मुस्लिम नेत्यांचे आश्‍वासन

दैनिक गोमन्तक

Goa: प्रेषित महमंद पैगंबर यांच्‍या जयंतीनिमित्त उद्या गुरुवार 28 रोजी मडगावातून काढल्‍या जाणाऱ्या जुलूस मिरवणुकीत फक्‍त 34 गाड्या वापरण्‍याची परवानगी जिल्‍हा प्रशासनाने दिली असून गर्दी टाळण्‍यासाठी अन्‍य कुठल्‍याही प्रकारच्‍या वाहनांचा मिरवणुकीत वापर केला जाऊ नये,अशी अट घालण्‍यात आली आहे.

या सर्व अटींचे आम्‍ही पालन करू आणि जुलूस मिरवणूक शांततेत काढू, असे आश्‍वासन मडगाव जामिया मशिदीचे अध्‍यक्ष उर्फान मुल्‍ला यांनी दिले.

मडगावात 17 मशिदी असून प्रत्येक मशिदीसाठी दोन गाड्या, असे प्रमाण ठरविले आहे. दक्षिण गोव्‍याचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्रीनेत कोठावळे यांनी आज मुस्‍लिम नेते आणि पोलिसांबरोबर बैठक घेऊन आवश्‍‍यक त्‍या सूचना त्‍यांना केल्‍या.

ही मिरवणूक मालभाट जामिया मशिदीकडून दुपारी 2.45 वाजता सुरु होणार असून ती नंतर नगरपालिकेसमोर येऊन उद्यानाला वळसा घालून हॉस्‍पिसियो मार्गे रवींद्र भवनकडे निघणार आहे. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आम्‍ही ही मिरवणूक आटोपती घेऊ, असे मुल्‍ला यांनी सांगितले.

आम्ही सर्व ती खबरदारी घेऊ!

प्रेषित महमंद पैगंबर यांनी सर्व जगाला शांततेचा संदेश दिला. तोच संदेश लाेकांपर्यंत पोहचावा, याच उद्देशाने दरवर्षी आम्‍ही हा जुलूस काढत आहोत. या मिरवणुकीमुळे अन्‍य कुणालाही कसलीही अडचण येणार नाही, याची पूर्णपणे खबरदारी आम्‍ही घेऊ, असे मुल्‍ला यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Safety: 'पर्यटकांशी गैरवर्तन खपवून घेणार नाही'! पर्यटन खात्‍याचा इशारा; जबाबदारीचे भान ठेवण्‍याचे आवाहन

Goa Politics: 'अभियंत्याला पोलिसांनी नेले, वीज मंत्री काय करीत आहेत'? पाटकरांचा सवाल; अभ्यास करण्याचा ढवळीकरांना सल्ला

Goa Politics: खरी कुजबुज; घराबाहेर आले...पोलिस घेऊन गेले...!

Naru In Goa: गोमंतकीयांसाठी धोक्याची घंटा! गोव्यात आढळला खतरनाक 'नारू'; खांडेपार, कुर्टी येथे सापडला जंतू

Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT