Covid Vaccination
Covid Vaccination Dainik Gomantak
गोवा

Covid Vaccination : कांदोळी PHC अतंर्गत फक्त 2% विद्यार्थ्यांनाच मिळाली कोरोनाची लस

दैनिक गोमन्तक

कळंगुट/पणजी : सध्या कोरोनाचा देशासह राज्यातही कहर कमी झाला असून बाधितांच्या संख्या ही कमी आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनासंदर्भातील काही नियम शिथील करण्यात आले आहेत. कोरोनाच्या नियमांप्रमाणे होळीचा सण येथे साजरा होत आहे. तसेच राज्यात कोरोना लसीवर ही मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणेच लहानग्यांसाठी ही लसीकरणाची मोहिम शासनाकडून हाती घेण्यात आले आहे. सध्या राज्यात 12-14 वयोगटातील मुलांना लस टोचली जात आहे. कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात 50000 लसीचे उद्दिष्ट आहे. मात्र लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी फक्त 29 विद्यार्थ्यांना पहिला कोविड डोस मिळाल्याचे उघड झाले असून ते उद्दिष्टाच्या फक्त फक्त 2% आहेच. (only 2 two per cent of the targeted 50,000 children, received the first dose in Candolim PHC)

कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कळंगुट (Calangute), नेरुळ (Nerul), पिलेर्ने (Pilerne) आणि रिस मागोस (Reis Magos) या आठ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवार आणि गुरुवारी 12-14 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्याप्रमाणे कोविड लसीचा (Covid dose) पहिला डोस प्राप्त असून कॉर्बेव्हॅक्स लस (Corbevax vaccine) दिली जात आहे. तर दुसरा डोस 28 दिवसांनी दिला जाणार आहे. यावेळी पहिल्या दिवशी फक्त 29 विद्यार्थ्यांनी डोस घेतला असून ते सेंट थेरेसा स्कूल कांदोळीचे विद्यार्थी आहेत. तर पुढच्या गटाला 21 मार्च रोजी डोस दिला जाईल.

यावेळी कांदोळी (Candolim) प्राथमिक आरोग्य केंद्राचे (PHC) आरोग्य अधिकारी डॉ. रोशन नाझरेथ म्हणाले की, परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा लसीकरणाचा कार्यक्रम (vaccination programme) मंद होण्याची शक्यता आहे. आम्ही मुलांना (Students) आणि शाळांना लसीकरण केव्हा करायचे आहे ती तारीख निवडण्याची मुभा दिली आहे. याचे कारण सुरू होणाऱ्या परिक्षा असून विद्यार्थ्यांना परिक्षा द्यायची आहे. मात्र लसीकरण करायचे की नाही हे सर्व शाळांवर अवलंबून आहे.

तर फक्त लसीकरणासाठी परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना त्रास देणे योघ्य नाही. कारण ते खूप दिवसांनी शाळेत जाऊन परिक्षा (Exam) देणार आहे, असेही नाझरेथ म्हणाले. तसेच लसीकरणासंदर्भात आम्ही शाळांना कळवले आहे की, त्यांना लसीकरण कधी करायचे आहे, त्याची तारीख त्यांनी आम्हाला कळवावी. कारण लसीकरण हे विद्यार्थ्यांच्या संख्येवर ही अवलंबून आहे. त्यानंतरच आम्ही लसीकरणाचा कार्यक्रम (vaccination programme) निश्चित करू,” नाझरेथ म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT