Arrested Dainik Gomantak
गोवा

Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

Babolim Police Action: गुंतवणुकीच्या नावाखाली डिचोली येथील एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी मोठी कारवाई केली.

Manish Jadhav

डिचोली: गुंतवणुकीच्या नावाखाली डिचोली येथील एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी मोठी कारवाई केली. या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी मध्यप्रदेशातून एका 25 वर्षीय संशयित तरुणाला अटक केली. डिचोली पोलिसांना फसवणुकीची तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ तांत्रिक आणि सायबर माहितीच्या आधारे तपास सुरु केला. या तपासादरम्यान, फसवणुकीचे धागेदोरे मध्यप्रदेशपर्यंत पोहोचले.

मध्यप्रदेशातून आरोपीला अटक

शुभम कैलासचंद्र राठोड (वय 25, रा. मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम राठोड याने डिचोलीतील (Bicholim) तक्रारदार व्यक्तीला आकर्षक गुंतवणुकीचे आमिष दाखवले. चांगला परतावा देण्याच्या नावाखाली त्याने तक्रारदाराकडून मोठी रक्कम ऑनलाईन माध्यमातून आपल्या खात्यात जमा करुन घेतली आणि नंतर संपर्क तोडला. या फसवणुकीत तक्रारदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

डिचोली पोलिसांची यशस्वी कारवाई

डिचोली पोलिसांनी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करुन आरोपीच्या लोकेशनचा मागोवा घेतला आणि त्याला मध्यप्रदेशातून अटक केली. अटक केल्यानंतर आरोपी शुभम राठोड याला ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणण्यात आले. डिचोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीने अशा प्रकारे आणखी किती जणांना फसवले आणि यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. डिचोली पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कारवाईमुळे ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करणाऱ्या गुन्हेगारांना चांगलीच जरब बसली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT