Online Fraud: '..नामांकीत कंपनीचा अधिकारी बोलतोय'! 40 जणांना 'ऑनलाईन' गंडवले; 24 वर्षीय तरुणाला झारखंड येथे अटक

Jamtara cyber crime arrest: ‘रिचार्ज पॅकेज’च्या नावाखाली एका महिलेची ‘ऑनलाईन’ फसवणूक केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
online recharge package fraud from Jamtara
online recharge package fraud from JamtaraDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: ‘रिचार्ज पॅकेज’च्या नावाखाली एका महिलेची ‘ऑनलाईन’ फसवणूक केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकरणात झारखंड येथील प्रदीपकुमार मंडल या २४ वर्षीय युवकाला डिचोली पोलिसांनी शनिवारी मोठ्या शिताफीने अटक केली. झारखंडमधील जामतारा परिसरात ही कारवाई केल्यानंतर संशयिताला डिचोलीत आणून न्यायालयासमोर हजर केले.

फसवणुकीचा हा प्रकार गेल्या महिन्यात घडला होता. फसवणुकीला बळी पडलेली गृहिणी गोकुळवाडा - साखळी येथील अनुषा श्रीकांत वाडकर हिला तिच्या मोबाईल फोनवर दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून अज्ञात व्यक्तीकडून कॉल आले.

‘मी एका नामांकीत कंपनीचा अधिकारी आहे. रिचार्ज पॅकेजसाठी अमुक-अमुक पैसे भरावे लागणार’. असे सांगून या अज्ञात व्यक्तीने अनुषा हिच्या बँक खात्याची सविस्तर माहिती घेऊन तिची फसवणूक केली. आपल्याला ४४ हजार ३४० हजार रुपयांना हातोहात फसवले आहे. याची जाणीव होताच अनुषा हिने डिचोली पोलिसात धाव घेऊन अज्ञाताविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.

online recharge package fraud from Jamtara
Goa Crime: 23 वर्षीय युवक ‘ड्रग्स पॅडलर’! सत्तरीतील बारवर छापा; 631 ग्रॅम गांजा ताब्यात

संशयित झारखंड येथे असल्याचा सुगावा लागताच पोलिसांचे एक पथक झारखंड येथे गेले. झारखंडमधील जामतारा परिसरात पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

online recharge package fraud from Jamtara
Goa Crime: 55 वर्षीय टॅक्सीचालकाला जबर मारहाण! पारधी टोळीच्या म्होरक्यांना अटक; पुणे-पंढरपूर कनेक्शन उघड

देशभर कारनामे

डिचोली पोलिसांनी अटक केलेल्या प्रदीपकुमार मंडल या संशयिताने देशभर आपले कारनामे करताना ४० हून अधिक जणांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com