Kala Academy in Panjim  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: अकादमीच्या मुख्य गेटसमोर कलाकारांचा.... 'द क्राय'

Goa Kala Akadami: कोसळलेल्या छताला वर्षपूर्तीनिमित्ताने कलात्मक श्रद्धांजली

गोमन्तक डिजिटल टीम

कला अकादमीचे खुले नाट्यगृहाचे छत कोसळल्यास आज एका वर्ष पूर्ण होत आहे. सरकारी पातळीवर कला अकादमीच्या नूतणीकरणात झालेल्या हेळसांडीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी निर्माण झालेली ‘कला राखण मांड’ ही संस्था त्यानिमित्ताने आज, बुधवार, १७ जुलै रोजी, ‘द क्राय’ या संकल्पनेमार्फत अभिनव सादरीकरणातून कला अकादमीला श्रद्धांजली वाहणार आहेत.

अर्ध्या तासाचा हा कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता, कला अकादमीच्या कोसळलेल्या छताखालील रंगमंचावर सादर करायचे ठरले होते. परंतु कलाकारांना तिथे जाण्यास कला अकादमीने मज्जाव केल्याने आता तो अकादमीच्या मुख्य गेटसमोर सादर होणार आहे.

चित्रकार हर्षदा केरकर, तियात्रिस्ट फ्रांसिस द तुयें, नाट्यकलाकार प्रशांती तळपणकार व राजदीप नायक, गायक साईश पाणंदीकार व नृत्यकलाकार सेसिल रॉड्रिग्स हे कलाकार या प्रसंगी सादरीकरण करतील. या कार्यक्रमाचे संचालन जेष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश मोघे करणार आहेत.

सद्याच्या काळात सांस्कृतिक क्षेत्रात होणार्‍या सरकारी गैरकारभारामुळे कलाकारांची होत असलेली घुसमट या कार्यक्रमातून व्यक्त करण्याची कलाकारांची मनीषा आहे. बेसुमार भ्रष्टाचारामुळे सरकारी मालकीच्या सांस्कृतिक केंद्रांची झालेली प्रचंड हानी व कला आणि संस्कृतीकडे पाहण्याचा सरकारचा उदासीन दृष्टिकोन यांवरील हे कलात्मक ‘रुदन’ असेल. 

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे॰ गोव्यातील कलाप्रेमी मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या श्रद्धांजलीला हजर राहावे असे आवाहन ‘कला राखण मांड’ने केले आहे. 

छत कोसळल्यानंतरचा संताप

खुल्या नाट्यगृहाचे छत कोसळल्यानंतर गेल्या वर्षी ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यात साऱ्यांचा राग-संताप, स्पष्टपणे उमटलेला दिसत होता. या भ्रष्टाचारी व्यवस्थेपुढे आपण किती हतबल आहोत याची जाणीव कला अकादमीच्या त्या उध्वस्त झालेल्या भागाने अनेकांना तीव्रपणे करून दिली होती.

‘कॅला अकादमी... शिवाजी ऽ शिवाजी ऽ शिवाजी..... असा आहे तरी कोण हा शिवाजी...??’ ‘कॅला अकादमी.. आणि इथे ओशाळला मृत्यू.’. हा एकनाथ सामंत यांचा फेसबुकवरील पोस्ट विशिष्ट मनोवृत्तीबद्दल स्पष्टपणे भाष्य करत होता. विशाल गावस हे व्यावसायिक नाट्यकलाकार आहेत. कला अकादमीकडे त्यांचा फार जुना संबंध आहे. ते आपला पोस्टमधून म्हणाले होते, ‘काल कला कोसळली. कात्रीस्टांचेर कलकल. (कात्री चालवणाऱ्यांवर कलकल) कमीशनाचो काळाबाजार... आता करा कविता’.

गोव्याचे प्रथितयश चित्रकार प्रवीण नाईक यांनी कला अकादमीच्या दुर्दैवी अवस्थेवर रेखाटलेले चित्र कलाकारांची अगतिक परिस्थिती आणि राजकारण्यांचे गल्लाभरू वर्तन यावर निर्भिडपणे प्रकाश टाकणारे होते. पद्मश्री पुरस्कार विजेते रेमो फर्नांडिस यांनी ‘जर भ्रष्ट व्यक्ती त्याखाली चिरडली असती तर आपल्याला त्याबद्दल काही वाटले नसते’ अशा तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT