कला अकादमीची ध्वनिप्रणाली जुनी आणि कालबाह्य झाली असून सभागृहातील ध्वनिक्षेपकही थिएटरसाठी उपयुक्त नसलेले बसवले गेले आहेत, असे मत भारताचा ‘साऊंड मॅन’ अशी ओळख असलेल्या रॉजर डेग्रो यांनी व्यक्त केले. ‘कला राखण मांड’ आणि रॉजर डेग्रो यांनी बुधवारी दुपारी कला अकादमीला प्रत्यक्ष भेट देऊन तांत्रिक बाबी तपासल्या. या पाहणीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डेग्रो बोलत होते. कला अकादमीतील ध्वनियंत्रणा जुनी झाली असून पूर्णतः निरूपयोगी बनल्याचेही डेग्रो म्हणाले.
रॉजर ड्रेगो म्हणाले की, कला अकादमीतील ध्वनी प्रणाली आठ वर्षे जुनी, कालबाह्य झालेली आहे. सभागृहाच्या शेवटच्या चार रांगेतील प्रेक्षकांना नीट आवाज ऐकू येत नाही. ध्वनिक्षेपकाबाबत ड्रेगो म्हणाले की ज्या कंपनीचे हे स्पीकर प्रेक्षागृहात बसवले आहेत ते थिएटरसाठी उपयुक्त नाहीत. फ्रान्सिस कोएल्हो म्हणाले की, सरकारने उत्तम प्रकारची ध्वनी प्रणाली कला अकादमीत बसवावी.
सेसिल रॉड्रिग्स म्हणाल्या की, अलीकडेच एका सादरीकरणावेळी स्टेजवर ठेवलेल्या मॉनिटर्समुळे समस्या आली. पण ते मॉनिटर्स स्टेजवरून काढण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मर्यादित मंचावरच सादरीकरण करावे लागले.गोवा फॉरवर्डचे नेते दिलीप प्रभुदेसाई यांनी सांगितले,की कला अकादमीतील प्रकाश व्यवस्था अद्ययावत करावी लागेल.
कला अकादमीत ध्वनिप्रणाली आणि प्रकाश व्यवस्था पूर्वी चांगली होती. परंतु कालांतराने हे सर्व आवश्यकतेनुसार ‘अपग्रेड’ करणे आवश्यक होते. उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था कलाकारांना उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यासाठी मदत करेल. पण अलीकडे कला अकादमीच्या मजल्यावर, स्टेजचा आणि पायऱ्यांचा सादरीकरणावेळी आवाज येतो. परिणामी कलाकारांच्या सादरीकरणात व्यवधान येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.