Goa Electricity Department Dainik Gomantak
गोवा

Electricity Department: वीज खात्यातील 325 कंत्राटी हेल्पर्सना एक वर्षाची सेवावाढ

वीज खात्याअंतर्गत गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ कंत्राटी पद्धतीवर सेवा बजावणाऱ्या 325 कंत्राटी लाईन हेल्परना पुन्हा एका वर्षांची सेवावाढ देण्याचा निर्णय

दैनिक गोमन्तक

गोवा: वीज खात्याअंतर्गत गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ कंत्राटी पद्धतीवर सेवा बजावणाऱ्या 325 कंत्राटी लाईन हेल्परना पुन्हा एका वर्षांची सेवावाढ देण्याचा निर्णय राज्य सरकार कडून घेण्यात आलेला आहे.

(One year extension to 325 contract helpers in electricity department goa)

दरम्यान, केंद्रीय वीजमंत्री आर. के. सिंग यांच्यासोबत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत त्यांनी गोव्याला मदत करणार असल्याचे आश्‍वासन दिले. तसेच केंद्रामार्फत राज्यात सुमारे एक हजार 602 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू होणार आहेत. दोन नवीन वीज उपकेंद्रे, भूमिगत वीजवाहिनी, स्मार्ट मीटर आणि विजेची चोरी रोखण्यासाठी प्रणालीचा समावेश आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

पर्वरी येथे मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते. उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येकी एका वीज उपकेंद्रासाठी केंद्राने तत्त्वतः मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांसोबत जेव्हा बैठक झाली, तेव्हा काही मुद्दे त्यांच्यापुढे मांडले होते.

यात सुधारित वितरण क्षेत्र योजना, नवीन उच्च दाबाची वीज उपकेंद्र, आर्थिक मदत, वीज प्रणाली विकास निधी, जास्त ताण असलेल्या कालावधीत अतिरिक्त वीज, ग्रीड जोडलेल्या छतावरील सौर ऊर्जा उपक्रम लागू करण्याच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी हे मुद्दे होते, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

राज्याला मिळणार 900 कोटी रुपये

मी जेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो, तेव्हा केंद्राकडून आर्थिक मदत आणली होती. आतादेखील वीज खात्यासाठी दिल्लीतून मदत आणली होती. आता राज्याला किमान 900 कोटी रुपये मिळणार आहेत, असा विश्‍वास सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला. हे सर्व प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करायचे आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

महसुलात सुमारे 30 कोटींची वाढ

वीज खात्याने एका महिन्यात चार हजार कनेक्‍शन जारी केली आहेत, अशी माहिती ढवळीकर यांनी दिली. एकरकमी समझोता, नवीन कनेक्‍शन आणि इतर माध्यमातून खात्याच्या महसुलात 25 ते 30 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीसाठी 40 कोटी

जुन्या किंवा जास्त ताण असलेल्या ट्रान्स्फॉर्मरमुळे उद्योगांना विजेची समस्या भेडसावत आहे. अतिरिक्त शुल्क भरूनही सरकार खुल्या बाजारातून वीज खरेदी करू शकते, असा आरोप उद्योगांनी केला आहे. लोडशेडिंग आणि वीज पुरवठ्यातील व्यत्यय यामुळे मोठे नुकसान होत आहे. ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी साडेपाच कोटी रुपयांची कार्यादेश दिले आहेत. या कामाला एक महिना लागेल. 40 कोटी रुपये खर्चून मोठ्या ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्यात येईल, असे ढवळीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT