Amboli Ghat Dainik Gomantak
गोवा

Amboli Ghat: आंबोली घाटातून प्रवास करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी, दगड कोसळल्याने एकेरी वाहतूक

Sindhudurg Amboli Ghat: भलामोठा दगड मार्गावर आल्याने घाटातून एकेरी वाहतूक सुरु आहे.

Pramod Yadav

सिंधुदुर्गातील आंबोली घाटातून प्रवास करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. घाटात दरड कोसळून भलामोठा दगड मार्गावर आल्याने घाटातून एकेरी वाहतूक सुरु आहे. आज (दि१७ जुलै) सकाळी सात वाजता ही घटना घडली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सातच्या सुमारास आंबोली घाटातील दरड खाली कोसळून एक भलामोठा दगड मार्गाच्या मध्ये येऊन थांबला. यामुळे काही काळासाठी मार्गावरील वाहतूक खोळंबली. दरम्यान, प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व दगड हटविण्यात आला.

Sindhudurg Amboli Ghat

सध्या घाटातून एकेरी वाहतूक सुरु असून, मार्गातील दगड बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सुदैवाने घटना घडली त्यावेळी येथे कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर दगड मार्गावर आल्याने मार्ग मोकळा करण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी देखी अशाप्रकारे एक मोठा दगड मार्गात आला होता. त्यावेळी देखील सुदैवाने मार्गात कोणी नसल्याने काही दुर्घटना घडली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT