Goa Crime News 
गोवा

Goa Crime News: गोव्यात चाललंय काय? आणखी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आईवरही अतिप्रसंगाचा प्रयत्न

Goa Crime News: मायणा-कुडतरी येथील एका सोळा वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News

राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. वास्कोत एका साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघा मजुरांना अटक केली आहे. दुसऱ्या घटनेत मायणा-कुडतरी येथील एका सोळा वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

वाडे-दाबोळी येथील साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार आणि खून प्रकरणात वास्को पोलिसांनी मुरारी कुमार (वय 24 वर्षे), उपनेश कुमार (वय 22 वर्षे) या दोघा मजुरांना अटक केली. दोघेही मूळ बिहार राज्यातील आहेत.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली मुरगाव तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई, वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक, उपनिरीक्षक अर्चना गावकर, उपनिरीक्षक रोहन मडगावकर, उपनिरीक्षक रोहन नागेशकर, हवालदार संतोष भाटकर, दामोदर मयेकर, पोलिस शिपाई पुरुषोत्तम नाईक आणि इतर पोलिसांनी आरोपींना गजाआड करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

आईवरही अतिप्रसंगाचा प्रयत्न

वास्कोतील घटनेत आणखी एक विदारक सत्य समोर आले आहे. संशयितांनी मुलीवर बलात्कार करण्यापूर्वी काही दिवस आधी तिच्या आईवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, त्यावेळी त्या महिलेने आरडाओरडा केल्याने सुरक्षा रक्षक असलेला तिचा पती धावत तेथे आला. त्यावेळी संशयित पळून गेले होते. मात्र, दुसऱ्या वेळी त्यांनी चिमुकल्या मुलीलाच आपले लक्ष्य बनविले. या प्रकाराबाबत राज्यातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.

मायणा-कुडतरीतही पुनरावृत्ती

मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार नोंद झाली आहे. संशयित 21 वर्षांचा आहे.

पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी भादंसंच्या 376, गोवा बाल कायदा कलम 8 व बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पीडित मुलीच्या पालकांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: कलियुगातील 'लव-कुश'

Pakistan Cricket: कोच पळाले, खेळाडू काढले अन् आता सिलेक्टर्सचा राजीनामा! मोहसीन नक्वींच्या नोटीसने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ; लॉर्ड्स पराभवानंतर तिळपापड

Goa Assembly Session 2026: खेळाडूंची 98 लाखांची बक्षिसे महिनाभरात मिळणार; क्रीडामंत्री तवडकरांची विधानसभेत हमी, यापुढे वितरणाला विलंब होणार नाही

Goa ST Reservation: धनगर समाजाच्या 'एसटी' दर्जाच्या प्रस्तावावर पुन्हा प्रक्रिया सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, सरदेसाईंच्या प्रश्नाला उत्तर

Goa E20 Petrol: ई-20 वरुन विधानसभेत खडाजंगी! पॉवर पेट्रोल वापरण्याच्या काब्रालांच्या सल्ल्यावर सरदेसाई भडकले; म्हणाले-'हे तर जखमेवर मीठ चोळण्यासारखं'

SCROLL FOR NEXT