A Unique Love Story: जर्मनीची 64 वर्षीय महिला ग्वाल्हेरच्या 35 वर्षीय मुलाशी करणार लग्न, गोव्यात जडलं प्रेम

A Unique Love Story: दोघांनी ग्वाल्हेर जिल्हाधिकारी कार्यालयात लग्नासाठी अर्ज केला आहे.
A Unique Love Story
A Unique Love Story

A Unique Love Story

प्रेमात धर्म, देश, भाषा आणि वय या गोष्टी कधीच अडथळा ठरू शकत नाहीत. अशीच एक प्रेमकहाणी सध्या समोर आली असून, जर्मनीतील 64 वर्षीय महिला ग्वाल्हेरमधील 35 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली आहे.

दोघांनी ग्वाल्हेर जिल्हाधिकारी कार्यालयात लग्नासाठी अर्ज केला आहे. दोघांची गोव्यात भेट झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरच्या गोविंदपुरी भागात राहणारा 35 वर्षीय मुलगा गोव्यात म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काम करतो. दरम्यान, एक 64 वर्षीय जर्मन महिला भारतात आली असता दोघांची भेट झाली.

दोघांमधील संवाद हळूहळू वाढत गेला, संवादाचे रुपांतर मैत्रीत झाले अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

जर्मन महिला आणि तरुणाने भोपाळ येथील वकिलाशी संपर्क साधून लग्नाची कागदपत्रे तयार करून घेतली, मात्र वकिलाने तयार केलेली कागदपत्रे भारतीय विवाह कायद्यांतर्गत होती.

A Unique Love Story
Sangolda: सांगोल्डातील सर्व 22 बेकायदेशीर घरे जमीनदोस्त; बेघरांसाठी नाईक घेणार CM सावंतांची भेट

जर्मन महिलेचा घटस्फोट झाला असून तिने ग्वाल्हेरच्या मुलाशी लग्न करण्याची तयारी दर्शवली आहे. शुक्रवारी जर्मन महिला तिच्या प्रियकर आणि वकिलासोबत ग्वाल्हेरच्या एडीएम अंजू अरुण कुमार यांच्या कार्यालयात दाखल झाले.

भारतीय नागरिकाचा परदेशी नागरिकाशी विवाह करण्यासाठी दूतावास आणि इतर कागदपत्र सादर करण्याची तरतूद आहे. त्यामुळे जर्मन महिलेच्या दूतावासातील कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच हा विवाह सोहळा होईल, असे तज्ज्ञ सांगतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com