Murder At Chimbel Dainik Gomantak
गोवा

Murder At Chimbel: चिंबलमध्ये चाकूने वार करून एकाचा खून

कौटुंबिक वादाचे पर्यवसान : नाकाबंदी करून पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या

गोमन्तक डिजिटल टीम

Murder At Chimbel इंदिरानगर-चिंबल येथे बुधवारी मध्यरात्री दोन कुटुंबांमध्ये झालेल्या कौटुंबिक वादावेळी मुरुगन ऊर्फ बाल्लू गवंडर याचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी चौघांना अटक केली. खून केल्यानंतर कर्नाटकात पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयितांना नाकाबंदी करून जुने गोवे पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयितांची नावे प्रतीक्षा ऊर्फ नीलिमा परशुराम गवंडर, परशुराम गवंडर, लिंगनाथ रघुनाथ पालयेकर ऊर्फ पालकर आणि हेमंत रघुनाथ पालकर अशी आहेत.

इंदिरानगर-चिंबल येथील टॅक्सीचालक दीपक माने यांच्या घरासमोर येऊन तिन्ही संशयितांनी त्‍यांच्या पत्नीला शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याने या दोन्ही कुटुंबांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

संशयितांनी तक्रारदाराच्या पत्नीला मारहाण करण्याबरोबरच तक्रारदाराचा नातेवाईक सुब्रह्मण्यम गवंडर याच्या अल्पवयीन मुलालाही मारहाण करत त्यांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर संशयितांनी तक्रारदाराचा मेहुणा मुरुगन ऊर्फ बाल्लू गवंडर याच्यावर हल्ला चढवला.

लिंगनाथ पालयेकर याने चाकूने मुरुगनच्या छातीवर सपासप वार केले. त्यात मुरुगनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयितांनी तेथून पलायन केले.

पलायनाचा प्रयत्न अयशस्वी

संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची चार वेगवेगळी पथके तैनात केली होती. पोलिसांनी लिंगनाथ पालयेकर, प्रतीक्षा ऊर्फ नीलिमा गवंडर आणि परशुराम गवंडर यांना रात्रीच ताब्यात घेतले, तर चौथा संशयित हेमंत पालकर हा अटक चुकवून गोव्याबाहेर जाण्याच्या प्रयत्नात असताना चोर्ला घाटातून त्याला ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LPG Subsidy New Rule: 1 ऑक्टोबरपासून मोठा दणका! बायोमेट्रिक आधार नसेल तर बंद होणार एलपीजी सब्सिडी; ग्राहकांसाठी नवा कडक नियम जाहीर

Goa Politics: आघाडीसाठी काँग्रेसची कवाडे खुली; भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्धार, राज्यभर 'गोवा रक्षण यात्रा'

Horoscope 20 Saptember 2026: ग्रहांची महा-युती आणि 12 राशींचा टर्निंग पॉईंट! काहींना धनलाभ तर काहींना धोक्याचा इशारा; आजचा दिवस ठरणार 'गेमचेंजर'

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

SCROLL FOR NEXT