Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Accident Case: मोले अपघातात एक ठार; एक जखमी

Accident Case: आशिष साहू याला उपचारासाठी गोमेकॉत नेले असून मृत शिवकुमार सिंग याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. अपघातानंतर ट्रक घेऊन चालकाने तेथून पळ काढला.

दैनिक गोमन्तक

Accident Case: सोनवली दूधसागर येथील महादेवाच्या कालोत्सवात जाऊन फोंडा येथे परतत असताना पळसकटा-मोले येथे ट्रक व स्कुटर यांच्यात झालेल्या अपघातात शिवकुमार सिंग (वय 23, मूळ मध्य प्रदेश ) याचा मृत्यू झाला, तर आशिष साहू (वय 25, मूळ मध्य प्रदेश) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

आशिष साहू याला उपचारासाठी गोमेकॉत नेले असून मृत शिवकुमार सिंग याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. अपघातानंतर ट्रक घेऊन चालकाने तेथून पळ काढला.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार,

(जीए-०५-ई- ३२५२) क्रमांकाची स्कुटर मोले येथून फोंड्याच्या दिशेने जात होती. संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास पळसकटा येथील धाट जंक्शनजवळ अचानक विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची स्कुटरला धडक बसली. यात स्कुटरचालक जागीच ठार झाला, तर मागे बसलेला आशिष गंभीर जखमी झाला. आशिषला १०८ रुग्णवाहिकेतून प्रथम पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

नंतर अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेले. अपघातानंतर चालकाने ट्रकसह तेथून पलायन केले. अपघातात मृत झालेला शिवकुमार सिंग हा 15 दिवसांपूर्वीच गोव्यात आला होता. तो फोंडा परिसरात जिओ टेलिकॉम कंपनीमध्ये नोकरीला होता.

रविवारी कुळे येथील दूधसागर महादेव देवस्थानात कालोत्सव असल्याने दुपारी मित्रांसह देवदर्शन करून माघारी परतताना हा अपघात झाला. कुळे पोलिसांनी पंचनामा केला आहे.

तसेच अपघातात कारणीभूत ठरलेला खनिजवाहू ट्र्क पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलिस चालकाचा शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत चालक सापडला नव्हता, अशी माहिती कुळे पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: क्रूझ पर्यटन हंगामाला सुरुवात, पहिले जहाज दाखल; 2 हजार पर्यटकांनी घेतले गोवा दर्शन

Goa Agriculture: कृषी लागवडीत 1.927 हेक्‍टरने घट! भात लागवडीचे 10,207 हेक्‍टर क्षेत्र घटले; 11 वर्षांचा तपशील

Tiger Reserve Goa: दोन टप्प्यांत व्याघ्र प्रकल्प साकारा! पाहणीअंती सक्षम समितीची शिफारस; 15 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

Horoscope: प्रयत्नांना अपेक्षित दिशा मिळेल, नोकरी किंवा व्यवसायात लाभ; 'या' राशीच्या लोकांनी लक्षात ठेवा आजचा दिवस तुमच्या बाजूने वाहतोय

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT