PM Narendra Modi: मोदींच्या सभेसाठी जुनाट वृक्षांची तोड

PM Narendra Modi: कदंब बस स्‍थानक परिसरात असलेले काही जुने भले मोठे वृक्ष मुळासकट कापून काढल्‍याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.
Tree Cutting
Tree CuttingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या 6 रोजी मडगावात होणाऱ्या सभेनिमित्त तयारी पूर्णत्‍वाच्‍या दिशेने आली असून, येथील कदंब बस स्‍थानक परिसरात असलेले काही जुने भले मोठे वृक्ष मुळासकट कापून काढल्‍याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

ॲड. नॉर्मा आल्‍वारिस यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. हे वृक्ष गेली कित्‍येक वर्षे लोकांना सावली देत होते. कित्‍येक लोक त्‍या वृक्षाच्‍या सावलीखाली थांबायचे. हे वृक्ष तसेच ठेवले असते तर सभेला त्‍याचा काही व्‍यत्‍यय आला असता का? असा प्रश्‍‍न लोक विचारत आहेत. या वृक्षाच्‍या जागेत सध्‍या मातीचा भराव घालून नंतर तिथे डांबरीकरण करण्‍यात येणार असल्‍याची माहिती मिळाली.

आल्‍वारिस यांनी जारी केलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे की, मोदी यांच्‍या सभेनिमित्त वृक्षतोडीसोबत भटकी कुत्री, गुरांवरही संक्रांत येत आहे. अल्‍पावधीत हजारोंच्‍या संख्‍येने भटक्‍या कुत्र्यांना पकडणे शक्‍य आहे का? तसेच त्‍यांची पर्यायी व्‍यवस्‍था कशी करणार?

Tree Cutting
Goa Politics: गावडे-तवडकर वादाचे पडसाद आज अधिवेशनामध्ये उमटणार!

सभेची तयारी पूर्ण

मडगाव येथे 6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंतप्रधानांच्या सभेनिमित्त प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्‍यात आली आहे. वरिष्‍ठ पातळीवरून त्‍यासाठी पाहणी करण्‍यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये पशु-पक्षी यांच्याविषयी प्रेम व्‍यक्‍त करून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला आहे. त्‍यांच्‍या दौऱ्यावेळीच जर अशी वृक्ष कत्तल होत असेल तर ते निंदनीय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Modi Cabinet Reshuffle 2026
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
PM Modi Digital India New Chapter
Modi government political challenge
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com