Goa Drugs Case
Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: थिवी येथे 71 हजारांच्या गांजासह पश्चिम बंगालमधील एकाला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs Case: कोलवाळ पोलिसांनी आज अंमली पदार्थांच्या छाप्यात पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. थिवी मेडल जंक्शन येथे कोलवाळ पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थांवर छापा टाकला.

यावेळी त्यांनी रब्बानी रा. रसीदुल सरकार (वय 31 वर्षे रा. थिवि, मूळ रहिवासी पश्चिम बंगाल) याला ताब्यात घेतले आहे.

यावेळी त्याच्या कडून 710 ग्रॅम वजनाचा गांजा (अंदाजे 71000 रुपये) जप्त करण्यात आलाय. त्याच्यावर अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.

एसपी नॉर्थ शिवेंदू भूषण, आयपीएस, एसडीपीओ मापुसा श्री यांच्या संपूर्ण देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.

LPSI सोनम वेरेणकर यांच्या नेतृत्वाखाली एचसी पांडुरंग नाईक, पीसी-सुलेश नाईक, सदाशिव परब आणि रामेश्वर गावस यांच्या समवेत अंमली पदार्थांवर छापा टाकला असून पुढील तपास पीएसआय मंदार परब करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT