Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Bicholim Ganesh Chaturthi Market: पार्किंगचे नियोजन न झाल्याने यंदा चतुर्थी बाजारावेळी डिचोली शहरात वाहतुकीचे ‘तीनतेरा’ वाजण्याची शक्यता आहे.
Bicholim Ganesh Chaturthi Market
Bicholim Traffic RestrictionsDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: पार्किंगचे नियोजन न झाल्याने यंदा चतुर्थी बाजारावेळी डिचोली शहरात वाहतुकीचे ‘तीनतेरा’ वाजण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, बाजारातील गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवारपासून रविवारी सायंकाळपर्यंत सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत आपत्कालीन सेवा वगळता अन्य वाहनांना बाजारात प्रवेशबंदी करण्यात येणार आहे.

Bicholim Ganesh Chaturthi Market
Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

दरवर्षी चतुर्थी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने दुचाकींसह अन्य वाहनांना बाजारात प्रवेश दिला जात नाही. यंदाही बाजाराला जोडणारे सर्व मार्ग बंद राहणार असून, केवळ व्यापाऱ्यांची वाहने ठराविक ठिकाणी सोडण्यात येतील.

वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांसह पालिका कर्मचारी तैनात असतील. मात्र, चतुर्थी बाजारातील वाढती गर्दी लक्षात घेऊन दरवर्षी पालिकेतर्फे अतिरिक्त जागा पार्किंगसाठी राखीव ठेवली जाते.

Bicholim Ganesh Chaturthi Market
Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com