Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

Flood Relief Goa: खारेवाडो-वास्को येथील ‘विश’ आणि ‘अर्ज’च्या केंद्रातून आज गुरुवारी सायंकाळी मदतसामग्री घेऊन जाणारा ट्रक रवाना झाला.
Flood Relief Goa
Nepal FloodDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: आसाम आणि नेपाळमधील पूरग्रस्त कुटुंबांसाठी विश (वुमन इनिशिएटिव्ह फॉर सेल्फ हेल्प) आणि अन्याय रहित जिंदगी (अर्ज) यांच्या वतीने तीन हजार किलो मदतसामग्री रवाना करण्यात आली. या सामग्रीत सुमारे २०० पिशव्या कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

खारेवाडो-वास्को येथील ‘विश’ आणि ‘अर्ज’च्या केंद्रातून आज गुरुवारी सायंकाळी मदतसामग्री घेऊन जाणारा ट्रक रवाना झाला.शर्ट, पँट, साड्या, ब्लाऊज, उबदार कपडे, लहान मुलांचे कपडे, बेडशीट्सचा या मदतसामग्रीत समावेश आहे. पुरामुळे घरदार आणि जीवनावश्यक वस्तू गमावलेल्या कुटुंबांना त्‍यामुळे मोठा आधार मिळणार आहे.

Flood Relief Goa
Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

‘विश’ हा तस्करी आणि हिंसाचारातून बचावलेल्या महिलांच्या उपजीविकेसाठी कार्यरत उपक्रम आहे. त्यामुळे ‘पीडितांकडून पीडितांसाठी’ हा या मोहिमेचा संदेश ठरला आहे. आयुष्यात कठीण प्रसंगांना सामोरे गेलेल्या महिलांनी संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. या प्रयत्नातून माणुसकी, एकजूट आणि सन्मानाची भावना अधोरेखित झाली आहे. ही मदत पूरग्रस्त कुटुंबांसाठी दिलासा आणि आशेचा आधार ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

कपडे आणि जीवनावश्यक वस्तू

आसाम आणि नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी सुमारे तीन हजार किलो मदतसामग्री पाठविण्यात आली. त्यात सुमारे २०० पिशव्या कपडे व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

Flood Relief Goa
Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

पीडित महिलांनी केले पॅकिंग

नागरिकांनी दान केलेल्या कपड्यांची ‘विश’शी संबंधित मुली आणि पीडित महिलांनी छाननी, घडी व पॅकिंग केले. स्वतः संकटातून गेलेल्या महिलांनी पूरग्रस्तांसाठी पुढाकार घेतल्याने ‘पीडितांकडून पीडितांसाठी’ हा संदेश अधोरेखित झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Nepal Flood Prediction Video
Nepal Flood Rescue Video
Nepal Flood Recovery
Nepal Flood Missing Persons
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com