Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: जमिनीचा वाद, ठोशाचा मार; भाटपाल-काणकोणात 1 ठार

Goa Crime News: संशयित ताब्‍यात : जिल्‍हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार

दैनिक गोमन्तक

Goa Crime News:

भाटपाल-काणकोण येथे जमिनीच्या वादातून एकाचा मृत्यू होण्‍याची घटना घडली. मृताचे नाव संतोष रिवणकर असे आहे. संशयित रोहन नाईक याला पोलिसांनी अटक करून न्‍यायालयासमोर उभे केले असता त्‍याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली.

काल रविवारी संतोष रिवणकर व रोहन नाईक यांच्यात बाचाबाची झाली. त्‍यावेळी रोहन नाईक याने संतोष रिवणकर याच्‍यावर हाताने ठोसा हाणला. गंभीर मार लागल्‍याने तो खाली कोसळला व त्याचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूचे निश्‍चित कारण वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे काणकोणचे पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांनी सांगितले.

संतोष रिवणकर व सागर मोरजकर यांच्यात जमिनीसंदर्भात वाद आहे. या दोघांची पोट्टे येथे वीस कलमी कार्यक्रमाअंतर्गत दिलेल्या जमिनीत घरे आहेत. मात्र सागर मोरजकर याला तीन क्रमांकाचा जमिनीचा प्लॉट दिला असताना त्याने प्लॉट क्रमांक पाचवर पक्के बांधकाम करण्यास सुरूवात केल्यानंतर त्याच्याविरोधात संतोष रिवणकर व भाऊ सचिन रिवणकर यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम रोखण्‍याचा आदेश दिला. तरीसुद्धा त्याने काम सुरूच ठेवले, रोहन नाईक हा सागर मोरजकर याचा मित्र असून बांधकामावर तोच देखरेख ठेवत होता. बांधकामावर पाणी मारताना संतोष रिवणकर याने त्याचा व्हिडिओ काढला. तसेच याबाबत त्याने व त्याचा भाऊ सचिन या दोघांनी रोहन नाईक याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्‍यानंतर रोहन व संतोष यांच्यात बाचाबाची झाली.

प्रकरण हातघाईवर गेले. रोहनने ठोसा मारून ढकलल्यामुळे संतोषचे डोके जमिनीवर आपटले. गंभीर अवस्थेत त्‍याला प्रथम काणकोण सामाजिक इस्पितळात व नंतर जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. पण तेथे त्‍याला मृत घोषित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT