Rivona Death Case Dainik Gomantak
गोवा

Rivona Death Case: सुपारी काढताना लागला विजेचा धक्का! रिवणात एकाचा मृत्‍यू

मडगावच्‍या सरकारी इस्‍पितळात आणले असता त्यांचा मृत्यू झाला

Kavya Powar

Rivona Death Case: रिवण येथील एका फार्ममध्‍ये सुधाकर नागवेकर (56) यांना उच्‍च दाबाचा विजेचा धक्का लागून त्यांचा दुर्दैवी मृत्‍यू झाला. वीज वाहिन्‍यांखाली एक व्‍यक्‍ती बेशुद्धावस्‍थेत पडली होती. त्यांना मडगावच्‍या सरकारी इस्‍पितळात आणले असता त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद डॉक्‍टरांनी केली.

पोलिसांनी चौकशी केली, तेव्‍हा नागवेकर हे सुपारी काढत होते. सुपारी काढताना उच्‍च दाबाच्या वीजवाहिनीच्या संपर्कात आल्यामुळे ते खाली कोसळले. याप्रकरणी केपे पोलिसांनी पंचनामा केला.

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवागारात ठेवला असून अनैसर्गिक मृत्‍यू म्‍हणून फौजदारी आचार संहितेच्‍या 174 कलमाखाली या प्रकरणाची नाेंद पोलिसांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

Goa Water Issue: तीन महिन्यांतून एकदा वॉटर मीटर तपासणी सक्तीची! गोवा मानवाधिकार आयोगाचे PWD आणि आरोग्य खात्याला कडक निर्देश

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

SCROLL FOR NEXT