Bull Attack :  Dainik Gomantak
गोवा

Bull Attack : धीरयोतील बैलाने शिंग खुपसले; वार्का येथील तरुणाचा मृत्यू

Bull Attack : बाणावली येथील ताज हॉटेलमागील शेतात लावलेल्या बैलांच्या धीरयो पाहण्यास गेलेल्या जोविटो वाझ (४१) या वार्का येथील युवकाच्या पोटात झुंजीच्या बैलाने शिंग खुपसल्याने तो ठार झाला.

दैनिक गोमन्तक

Bull Attack : बाणावली येथील ताज हॉटेलमागील शेतात लावलेल्या बैलांच्या धीरयो पाहण्यास गेलेल्या जोविटो वाझ (४१) या वार्का येथील युवकाच्या पोटात झुंजीच्या बैलाने शिंग खुपसल्याने तो ठार झाला. ही दुर्घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

बाणावली येथील शेतात ह्या धीरयो लावण्यात आल्या होत्या. त्या पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती. त्यावेळी एका बैलाने धावताना मध्ये आलेल्या जोविटो याच्या पोटात शिंग खुपसल्याने तो जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने मडगाव येथील व्हिक्टर इस्पितळात नेण्यात आले, परंतु तेथे त्याला मृत घोषित केले.

ही दुर्घटना शेकडो लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली असतानाही कोलवा पोलिस मात्र सारवासारव करताना दिसून आले. वास्तविक बैलाने पोटात शिंग खुपसल्याने रक्ताच्या थारोळ्यातील जखमी जोविटो याला सरकारी जिल्हा इस्पितळात नेण्याची गरज असतानाही त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला. यासंबंधी कोलवाचे पोलिस निरीक्षक

थेरन डिसोझा यांना विचारले असता, हा मृत्यू नेमका कसा झाला हे कळत नाही. मृताच्या घरच्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जोविटो गुरांना चारा घालण्यास गेला असता बैलाने त्याच्यावर हल्ला केला असे सांगितले आहे अशी माहिती दिली.

या दुर्घटनेनंतर वार्का गावात काहीशी तणावाची स्थिती होती. व्हिक्टर इस्पितळ आवारातही लोकांनी गर्दी केली होती आणि तिथेही तणाव जाणवत होता.

दर आठवड्याला होतात धीरयो

बैलांच्या झुंजी (धीरयो) लावण्यास कायद्याने बंदी असून अशा झुंजीचे आयोजन झाल्याचे आढळून आल्यास त्या भागातील पोलिस निरीक्षकाला जबाबदार धरून कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले असतानाही दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात अशा झुंजी दर आठवड्याला आयोजित केल्या जात असून त्यावर लाखोंचा सट्टा लावला जातो. प्रत्येक झुंजीमागे पोलिसांना घसघशीत हप्ता मिळत असल्याने तेही या बेकायदेशीर झुंजीकडे कानाडोळा करत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT