Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case : बाणावली येथे अडीच लाखांच्या गांजासह एकाला अटक

नावेली बाणावली येथे गांजा घेऊन आलेल्या महमद अख्तर मोंडल या 23 वर्षीय युवकाला कोलवा पोलीसांनी काल रात्री अटक करून त्याच्याकडून अडीच किलो गांजा जप्त केला.

दैनिक गोमन्तक

मडगाव : नावेली बाणावली येथे गांजा घेऊन आलेल्या महमद अख्तर मोंडल या 23 वर्षीय युवकाला कोलवा पोलीसांनी काल रात्री अटक करून त्याच्याकडून अडीच किलो गांजा जप्त केला. या गांजाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अडीच लाख रूपये असल्याची माहिती पोलीस निरिक्षक थेरन डिसोजा यांनी दिली.

सदर युवक गांजा घेऊन येणार याची माहिती पोलिसाना खास सूत्राकडून मिळाल्यावर काल रात्री 11 च्या सुमारास पोलीसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे.

दरम्यान, साडेतीन लाखांचे ब्रेसलेट घेऊन त्याचे पैसे न देताच हैद्राबादकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवराज अगरवाल या हैदराबादी युवकाला फातोर्डा पोलिसांनी दाबोळी विमानतळ परिसरात काल रात्री अटक केली. संशयिताला मडगाव न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT