Saligao Crime News Dainik gomantak
गोवा

Saligao Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी संशयितास अटक; साळगाव पोलिसांची कारवाई

कळंगुट येथून संशयितास अटक

Rajat Sawant

Saligao : 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी साळगाव पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. या प्रकरणी सदर पीडितेच्या आईने साळगाव पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. आज संशयिताला कळंगुट येथून अटक करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास साळगाव पोलिस करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पीडीत मुलीच्या आईने गेल्या आठवड्यात साळगाव पोलिसांत तक्रार दिली होती. संशयितावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीच्या आधारे एएसआय सूर्यकांत कोळवलकर, पोलिस कॉन्स्टेबल विशांत मयेकर, वैभव आरोंदेकर, विजय पालनी, राहुल आंगोलकर यांचा समावेश असलेले पोलिस पथक संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गुरुवारी पीआय मिलिंद एम. भुईंबर व विश्वेष कर्पे यांच्या देखरेखीखाली कर्नाटकला गेले होते.

मात्र, संशयित पोलिसांना चकमा देत गोव्यात आला. आज अथक प्रयत्नांनंतर कळंगुट येथून संशयिताला अटक करण्यात साळगाव पोलिसांना यश आले. सुनील राठोड रा. कांदोळी, मूळ - कर्नाटक असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पीआय मिलिंद एम. भुईंबर यांच्या देखरेखीखाली पीएसआय निलम गवस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT