Goa HSSC Exam : बारावीची पुरवणी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार

वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही : शिक्षण मंडळ
12th Exam | Goa Education
12th Exam | Goa EducationDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात वाढत्या तापमानामुळे शिक्षण खात्याने उद्या शनिवारी शाळा बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. उद्या 10 जून रोजी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत.

दरम्यान गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी जूनची पुरवणी परीक्षा अधिसूचित केलेल्या वेळापत्रकानुसार होणार असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली. याबाबतचे परिपत्रक मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

12th Exam | Goa Education
Goa University : बडतर्फ 'एमटीएस' कर्मचाऱ्यांना विद्यापीठात पुन्हा नोकरी मिळवून द्या

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी जूनची पुरवणी परीक्षा मंडळाने अधिसूचित केलेल्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही तसेच उमेदवारांनी वेळापत्रकानुसार 10 जून रोजी परीक्षा केंद्रावर पोहचावे असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12 वी परीक्षेचा निकाल 95.46 टक्के लागला होता. यंदा एकूण १९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी १८ हजार ४९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलींचा टक्का ९५.८८ टक्के असून मुलांचा टक्का ९५.०३ टक्के इतका आहे.

४९ जणांचे निकाल विविध कारणांमुळे राखून ठेवले आहेत. एकूण ९,६६१ मुलांनी परीक्षा दिली. पैकी ९,१८१ मुले उत्तीर्ण झाली. यंदा ९,७१६ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९,३१६ मुली उत्तीर्ण झाल्या.

12th Exam | Goa Education
Chintan Shivir : सुशासनासाठी भाजपचे ‘चिंतन’; मंत्री, अधिकाऱ्यांमध्‍ये संवाद

लांबलेला मॉन्सून आणि वाढलेला उकाडा या पार्श्वभूमीवर शाळांचे वर्ग कमी करावेत किंवा शाळा बंद ठेवाव्यात अशी पालक, राजकीय पक्ष आणि बिगर शासकीय संस्थांची वाढती मागणी लक्षात घेऊन अखेर शिक्षण खात्याने उद्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.

शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी काढलेल्या आदेशानुसार, शनिवार, १० जून रोजी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहतील. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. तसा आदेश शिक्षण संचलनालयाने काढला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com