Harassment of Girls Dainik Gomantak
गोवा

दोन मुलींचा विनयभंग; संशयिताला अटक

दोन अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांना दुकानात कोंडून विनयभंग केल्याची घटना उघड

दैनिक गोमन्तक

पणजी : भाटले - पणजी येथील एका चिकन सेंटर दुकानदाराने दोन अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांना दुकानात कोंडून विनयभंग केल्याप्रकरणी संशयित तन्वीर अहमद याला काल गुरुवारी संध्याकाळी पणजी पोलिसांनी अटक केली. त्याला पोलिस कोठडीसाठी न्यायालयात उभे करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसानी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार दोन अल्पवयीन मुली गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास वडाभाव आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी या चिकन सेंटर दुकानदाराने त्यांना बोलावून दुकानात नेले. त्यांना खाद्यपदार्थ देऊन त्यांचा विनयभंग केला व दुकानात कोंडून ठेवले. घडल्या प्रकाराची माहिती न सांगण्याची धमकी दिली. भेदरलेल्या अवस्थेत दोन्ही मुली रडत घराकडे आल्या असता त्यांनी घडलेला प्रकार आईला सांगितला.

आईने त्या चिकन सेंटरच्या दुकनदाराला जाब विचारला. यावेळी तेथील इतर दुकानदारांनी तसेच लोकांनी संशयित तन्वीर याला दुकानातून बाहेर काढले व त्याने केलेल्या कृत्याबद्दल बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पणजी पोलिसांना बोलावून ताब्यात दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित तन्वीर अहमद हा मूळचा उत्तरप्रदेशमधील आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो चिकन सेंटरचे दुकान चालवतो. संध्याकाळच्या सुमारास दुकानात ग्राहक नसल्याने या दोन मुलींचा गैरफायदा घेण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, या मुलींनी त्याचा पर्दाफाश केला. त्याची पार्श्‍वभूमी तपासणीसाठी उत्तरप्रदेशमधील पोलिसांशी संपर्क साधण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT