Goa Drugs News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : गांजा बाळगल्याप्रकरणी एकावर कारवाई; मुख्यमंत्र्यांच्या घोषणा कागदावरच

हणजूण पोलिसांनी केली कारवाई

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसात राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा राज्यात अमली पदार्थ विरोधात धडक मोहिम राबवली जाणार आहे. यापूढे अमली पदार्थ विक्री करणारे अन् अवैधरित्या बाळगणाऱ्यांची ही गय केली जाणार नाही. अशी घोषणा केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांची ही घोषणा कागदावरच राहिली आहे का? असा प्रश्न नागरिक विचारु लागले आहेत.

(one arrested by Anjuna Police for possession of Methamphatamine and Ganja)

नागरिक असा प्रश्न विचारत आहेत कारण अमली पदार्थांवर आळा घालणे गरजेचे असताना असे गुन्हे दररोज घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर हणजूण पोलिसांनी मेथाम्फेटामाईन व गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई काल दिनांक 24/9/22 रोजी रात्री उशिरा वागातोर येथील एका वसतिगृहावर केली या वसतिगृहावर छापा टाकत आरोपी हिमांशू गोयल ( 25 वर्ष ) याला बेकायदेशीरपणे मेथॅम्फेटामाइन बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीकडून हणजूण पोलिसांनी सुमारे 15000 रुपयाचा मेथाम्फेटामाईन व गांजा जप्त केला आहे. तसेच NDPS कायद्याअंतर्गत कलम 20(बी ) (ii) ( ए ) आणि 22 ( ए ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पीआय प्रशाल देसाई, एलपीएसआय स्नेहा सावळ, कॉन्स्टेबल मयूर घाडी शुभम मयेकर, स्नेहल मलिक, रामदास हरमलकर, सदाशिव गौडे आणि रुपेश आजगावकर यांचा समावेश होता. तर एसपी नॉर्थ शोबित सक्सेना आयपीएस यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT