Colva police : बेकायदेशीर वास्तव्य करणारे आणखी दोन घुसखोर ताब्यात

सासष्टी परिसरात करतायेत वास्तव्य
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या काही दिवसांपासून गोवा राज्यात बेकायदेशीर वास्तव्य करत भारतातील नागरिक असल्याचा बनाव करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून. ते दोघेही गोव्यातील सासष्टी, आरली येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच कोलवाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

(Two Bangladeshi national staying at Orlim Salcete detained by Colva police )

Crime News
Panaji Bus stand : पणजी बस स्थानकावरील बाकांमुळे प्रवाशांची गैरसोय

मिळालेल्या माहितीनुसार सासष्टी, आरली येथे येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते दोघेही येथील भंगारवाड्यात काम करत होते आणि बांगलादेशी असल्याने आज कोलवाळा पोलिसांनी ही कारवाई केली.

यातील शाहीन करीम 40 वर्षीय तर फजल करीम हा 50 वर्षीय आहे. ते मुळचे बांगलादेशातील धर्मगंज, नारायणगंज येथील रहिवासी आहेत. ते आरली रहिवाशांच्या मालकीच्या स्क्रॅपयार्ड आवारात वास्तव्यास होते. दोघांना ही दोन 8 वर्षे आणि 6 वर्षे वयाची मुले आहेत.

Crime News
Michael Lobo : भाजप सोडणे ही माझी चूक होती

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून बांगलादेशासोबत असणाऱ्या कराराप्रमाणे या दोघांवर ही कारवाई करण्यात येईल अशी माहिती कोलवाळ पोलिसांनी दिली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोघे ही सासष्टी, आरली परिसरात मोलमजूरी करुन आपली गुजरान करत आहेत.

मात्र या दोघांनी ही काही गुन्हे केले आहेत का ? त्यांचा गोव्यात वास्तव्य करण्याचा आणखी काही हेतू होता का? याचा तपास कोलवाळ पोलिस करत असून. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत न्यायालय जो आदेश देईल त्याप्रमाणे प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. असे पोलिसांनी स्पष्ट केले.

सत्तरी तालुक्यातील दहा घुसखोरांना घेतलं ताब्यात

देशभरात विविध तपास यंत्रणांनी सुरु केलेल्या छापेमारीनंतर गोवा राज्यातही घुसखोरांनी दहा वर्षांपासून अधिक काळ बस्तान मांडल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. छापेमारी झाली नसती तर आणखी काही वर्षे हे दुष्टचक्र असेच सुरू राहिले असते. यातील गंभीर बाब म्हणजे, स्थानिकांनीच त्यांना खोल्या उभारून आश्रय दिला आहे आणि प्रशासनानेही राज्यात कोण, कुठून येऊन राहतो, व्यवसाय करतो, याची चौकशी केलेली नाही.

सध्या बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न गोव्यासह देशभरात गाजत आहे. दिनांक 24 सप्टेंबर पर्यंत सत्तरी तालुक्यातून जवळपास दहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात वाळपई, भुईपाल, नागवे या भागातून बांगलादेशी घुसखोरांना अटक झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com