Red Alert In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Red Alert: गोव्यात रेड अलर्ट; सोमवारी बारावीपर्यंतच्या विद्यार्थी, शिक्षकांना सुट्टी

Pramod Yadav

गोव्यात हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केल्या असून, खबरदारीचा उपाय म्हणून पहिलीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना उद्या (सोमवारी, दि.15 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी याबाबत माहिती दिलीय.

शिक्षण खात्याच्या वतीने याबाबत आदेश जारी केला आहे. राज्यात सोमवारी जारी करण्यात आलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर फाउंडेशन ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

प्रशिक्षणार्थी शिक्षकांना ही सुट्टी लागू असणार नाही. खबदराची उपाय म्हणून ही सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी १६ जुलैपासून नियमित शाळा, कॉलेज सुरु राहतील, असे शिक्षण खात्याने म्हटले आहे.

दरम्यान, हवामान खात्याने राज्यात रविवार आणि सोमवारी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राजधानी पणजीसह उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

याकाळात पणजीतील काही भागात पाणी साचण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. तसेच, कमजोर झाड कोसळणे, पाणी साचणे, किनारी भागात न फिरण्याची सूचना हवामान खात्याने केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गणेश मूर्तींमध्ये POP चा वापर? गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चाचणी

Maharashtra Politics: काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा 'घरोबा' उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरणार का?

Rape Case: बिहारमधील 29 वर्षीय कामगाराकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Goa Politics: फोंड्यात राजकीय हालचालींना वेग, ‘आयाराम गयाराम’चे फुटणार पेव; विधानसभा निवडणुकीत रंगणार घमासान!

Chaturthi In Goa: 200 मंडळींचं घर, नेत्रावळीतील प्रभुदेसाईंच्या 'रक्तवर्ण' गणेशाचा अडीचशे वर्षांचा अनोखा इतिहास

SCROLL FOR NEXT