Konkan Railway News: कोकण रेल्वे पुन्हा ठप्प, आता रत्नागिरीत दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Konkan Railway News: गोव्यात मालपे बोगद्यात झालेल्या घटनेमुळे वाहतूक खोळंबल्याच्या घटनेला चार दिवस पूर्ण होत असतानाच आता रायगडमध्ये दुसरी घटना घडली आहे.
कोकण रेल्वे पुन्हा ठप्प, आता रायगडमध्ये दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
Konkan Railway X Social Media

कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली असून, आता रत्नागिरी विभागात दरड कोसळल्याने मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवाणखवटीजवळ रेल्वे रुळांवर माती आल्याने वाहतूक खोळंबली आहे. कोकण रेल्वेच्या वतीने याबाबत माहिती दिली आहे.

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातील दिवाणखवटी येथे रेल्वे रुळांवर मातीचा ढीगारा आल्याने वाहतूक खोळंबली आहे. सायंकळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. तीन तासांत मातीचा ढीगारा हटवून वाहतूक पूर्ववत केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.

कोकण रेल्वे पुन्हा ठप्प, आता रायगडमध्ये दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
Konkan Railway Traffic: तब्बल 17 तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरुळीत, प्रवाशांचे बेकार हाल; 13 गाड्या रद्द, 17 अन्य मार्गाने वळवल्या

एक्स सोशल मिडियावर याबाबत एका युझरने माहिती दिली आहे. दिवाण खवटी नातुवाडी टनल जवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली दरड दूर करण्यास किमान दोन ते अडीच तासांचा वेळ लागेल, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

कोकण रेल्वेच्या वतीने रुळांवर आलेली माती हटविण्याचे काम सुरु असल्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. माती हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, यामुळे अनेक रेल्वे गाड्यांची वाहतूक प्रभावित झाली. याचा मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेसला देखील फटका बसला. मांडवी एक्सप्रेस गेल्या चार तासांपासून एका जागी उभी असल्याचे एका प्रवाशाने ट्विट केले आहे.

गेल्या आठवड्यात गोव्यातील मालपे - पेडणे येथील बोगद्यात चिखलमिश्रित पाणी आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला मात्र, मुसळधार पावसामुळे या बोगद्यात पुन्हा चिखलमिश्रित पाणी यायला लागले.

मार्ग मोकळा करुन वाहतूक सुरळीत करण्यास रेल्वे प्रशासनाला सतरा तास लागले. या घटनेला चार दिवस पूर्ण होत असतानाच आता कोकण रेल्वे मार्गावर दुसरी घटना घडल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com