COVID-19 Dainik Gomantak
गोवा

गुरुवारी गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट 40.88% तर रिकव्हरी रेट 88.2%

राज्यात कोरोना बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढत असली तरी काल 3728 जण कोरोनातून पूर्ण मुक्त झाले.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राज्य सरकारसाठी चिंतेची बाब आहे. गुरुवारचा पॉझिटिव्हिटी रेट 40.88% होता तर रिकव्हरी रेट 88.2% होता.

काल दिवासभारत, 570 प्रौढांनी लसीचा (Vaccine) पहिला डोस घेतला, तर 1,403 प्रौढांनी दुसरा डोस घेतला. याच बरोबर 1,791 आरोग्यसेवा कर्मचारी आणि जेष्ठ नागरिकांनी बुस्टर डोस घेतला. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 22 हजार 460 झाली आहे. गुरुवारी नवे 3390 बाधित रुग्ण सापडले आहेत. तर 9 जणांचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला. राज्यात कोरोना बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढत असली तरी काल 3728 जण कोरोनातून पूर्ण मुक्त झाले. तर 30 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, कोरोना संदर्भात सरकारतर्फे देण्यात येणारी माहिती अपुरी वाटते आहे. कारण दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता ही आकडेवारी यापेक्षा 10 पटीने जास्त आहे. अनेक रुग्ण चाचणी करत नसल्याने ऑडिट होऊन खरी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असे मत कृती दल आणि तज्ज्ञ कमिटी सदस्य डॉ.धनेश वळवईकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, राज्य सरकारतर्फे सध्याच्या मृत्यूसाठी लसीकरण (Vaccination) आणि अन्य आजाराने त्रस्त रुग्ण ही कारणे दिली जात असली तरी ती चुकीची असू शकतात. यासाठी तज्ज्ञ कमिटीने खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सध्या लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. तरीही बाधित आणि मृत्यूचे प्रमाणही वाढलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

SCROLL FOR NEXT