देशात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत उत्तर गोवा

उत्तर गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाबमधील जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हिटी रेट पेक्षा जास्त आहे.
COVID-19 Testing
COVID-19 TestingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: 13 ते 19 जानेवारी या कालावधीत उत्तर गोव्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 45.09% इतका होता. देशातील सर्वात जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत उत्तर गोव्याचा (North Goa) दहावा क्रमांक आहे. गोवा राज्यासाठी ही चिंतेची बाब मनाली जात आहे. (COVID-19 Latest Update Goa)

COVID-19 Testing
भाजपच्या इजिदोर फर्नांडीस यांचा उपसभापतीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा

याच कालावधीसाठी दक्षिण गोव्याचा (South Goa) पॉझिटिव्हिटी रेट 35.95% इतका होता. उत्तर गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाबमधील जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हिटी रेट पेक्षा जास्त आहे. दुसर्‍या लाटेनंतर काही महिन्यांपर्यंत गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा 2% पेक्षा कमी होता. मात्र डिसेंबरमध्ये गोव्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. या काळात ख्रिसमस आणि नवीन वर्षीच्या (New Year) स्वागतासाठी गोव्यातील स्थानिक लोक तसेच देशाच्या विविध भागातून आलेले पर्यटक (Tourist) गोव्यात ठीक ठिकाणी गर्दी करताना दिसले.

COVID-19 Testing
उत्पल पर्रीकरांना उमेदवारी का नाकारली?

गोव्यात टास्क फोर्सने कडक निर्बंध लादणे गरजेचे असल्याचे राज्य सरकारला सूचित केले होते. मात्र, त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होताना दिसली नाही. 8 जानेवारी रोजी झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत असे म्हटले आहे की, सदस्यांनी “खूप विचारविनिमय” केल्यानंतर, असा निष्कर्ष काढला आहे की, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत फरक आहे. परिणामी पॉझिटिव्हिटी रेट या एकाच निकषावर राज्यात निर्बंध लादणे योग्य ठरणार नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com