भाजपच्या इजिदोर फर्नांडीस यांचा उपसभापतीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा

इजिदोर फर्नांडीस यांनी पुढील दिशा ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांची शुक्रवारी (ता.21) संध्याकाळी 5 वाजता लोलये येथील निवासस्थानी बैठक बोलाविली आहे.
Ijidor Fernandes
Ijidor FernandesDainik Gomantak

काणकोण: माजी मंत्री रमेश तवडकर यांना पक्षाने भाजपची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उपसभापती इजिदोर फर्नांडीस यांनी पुढील दिशा ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांची शुक्रवारी (ता.21) संध्याकाळी 5 वाजता लोलये येथील निवासस्थानी बैठक बोलाविली आहे. त्याचबरोबर काल रात्री उशिरा त्यांनी आमदारकी, उपसभापती तसेच वनमहामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (Goa Politics Latest News)

Ijidor Fernandes
उत्पल पर्रीकरांना उमेदवारी का नाकारली?

त्याचप्रमाणे भाजप (BJP) सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी पक्षाकडे पाठवून दिल्याचे त्यांनी सांगितले. तर भाजपची उमेदवारी मिळालेले रमेश तवडकर यांनी आपली घरघर चलो अभियान जोरदार पणे सुरू केले आहे. काणकोणात 2017 निवडणुकीची (Election) पुनर्वात्ती होणार आहे.मात्र चेहरे बदलले असतील. सद्याच्या राजकीय घडामोडीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये कलगीतुरा वाढला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com