Verna National Highway Dainik gomantak
गोवा

वेर्णा राष्ट्रीय महामार्गावर गॅस पाईपलाईनने घेतला पेट, 'असा' टळला अनर्थ

अमित शहा याच मार्गाने आज फोंडा येथे मार्गस्थ होणार असल्याने एकच गोंधळ उडाला होता

दैनिक गोमन्तक

सुक्या गवताला लागलेल्या आगीमुळे इंडियन ऑइल अदानी गॅस पाईपलाईनने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज दुपारी 12 च्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी वेर्णा येथे राष्ट्रीय महामार्गावर वेर्णा ते दाबोळी मार्गावर एका ठिकाणी सुक्या गवताला आग लागली होती. दुपारची वेळ असल्याने आगीने अधिकच पेट घेतला.

दरम्यान याविषयी वेर्णा अग्निशमन दलाला माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान बंबसहित घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली.

मात्र एका ठिकाणी त्या आगीच्या लोटात बुडबुडे येत असल्याचे जाणवले. त्यांनी त्या ठिकाणी आगीवर नियंत्रण आणताच त्यांना त्या ठिकाणी एका पाईप मधून गॅसच्या गळतीमुळे आग लागण्याचे जाणवले. त्यांनी तत्काळ सदर कंपनी इंडियन ऑइल अदानी गॅस (gas) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कळवले असता, कंपनी अधिकारी वर्गाने या ठिकाणी येऊन पाहणी केली व आग (fire) आटोक्यात आणण्यात आणल्यानंतर त्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच मार्गाने आज फोंडा येथे मार्गस्थ होणार असल्याने एकच गोंधळ उडाला होता. संबंधित अधिकाऱ्यांवर पेचप्रसंग निर्माण झाला होता. मात्र वेळीच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण आणून तसेच याठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर आणल्याने मोठा अनर्थ टळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT