South Goa Power Shutdown Dainik Gomantak
गोवा

Power Shutdown in Porvorim : पर्वरीत 12 मे रोजी 'या' भागांमध्ये वीज पुरवठा खंडित

ग्राहकांनी नोंद घेण्याचे वीज खात्याचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील पर्वरी आणि परिसरात उद्यापासून वीजपुरवठा केला जाणार नाही आहे. वीज खात्‍याला 11 केव्ही एनआयओ फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वीज खात्यामार्फत करण्‍यात आले आहे.

शुक्रवार दि. 12 मे रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत कदंब डेपो, एनआयओ कॉलनी, सॉमिल पटेल, टाटा मोटर्स, गोदाम आणि सभोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

तसेच 11 केव्ही पर्वरी बाजार फिडरवरून दि. 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत वडाकडे, देवश्री गार्डन, कॉर्पोरेशन बँक, प्रायोरिटी, अल्कॉन ह्युंदाई, लिमावाडो, शांतीनगर, डॅमियन दी गोवा आणि सभोवतालच्या भागात वीज खंडित असेल.

शिवाय 11 केव्ही पुंडलिकनगर फिडरवरून दि. 12 मे रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत पत्रकार कॉलनी, साई सर्व्हिस, हॉटेल मॅजेस्टिक, दीपा नाईक डीटीसी, कुमेर बार डीटीसी, हायकोर्ट परिसर, हिरो शोरूम आणि आणि सभोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT