Omkar Elephant Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 'ओंकार'ला घाबरून विद्यार्थी घरात, शाळेत गेलेच नाहीत; तोरसे, पत्रादेवी येथे पुन्‍हा बागायतींत मुक्त संचार

Omkar Elephant In Goa: सिंधुदुर्गात तब्बल ६३ दिवस दहशत माजवून पुन्हा गोव्यात दाखल झालेल्या 'ओंकार' हत्तीने पेडणे तालुक्यातील पत्रादेवी, फकीर फाटा, तोरसे परिसरात पुन्हा शेतीची नासधूस सुरू केली आहे.

Sameer Amunekar

मोरजी: सिंधुदुर्गात तब्बल ६३ दिवस दहशत माजवून पुन्हा गोव्यात दाखल झालेल्या 'ओंकार' हत्तीने पेडणे तालुक्यातील पत्रादेवी, फकीर फाटा, तोरसे परिसरात पुन्हा शेतीची नासधूस सुरू केली आहे. आज पहाटेच हा हत्ती हरिजनवाडा-पंचशीलानगरच्या मुख्य रस्त्यावर थांबल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, परिणामी १६ ते १७ विद्यार्थी शाळा व हायस्कूलला गेलेच नाहीत.

वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी सतत ओंकार हत्तीच्या मागावर होते. रात्रीच्या वेळी हत्ती बागायतीत जाऊ नये म्हणून हो टीम मशाली आणि फटाक्यांसह तयारी करताना दिसून आली.

सकाळी साडेआठच्या सुमारास ओंकार हत्तीने तोरसे परिसरातील दोन-तीन शेतकऱ्यांच्या बागायतींची नासधूस केली. नेमकी किती हानी झाली याची माहिती लवकरच स्पष्ट होईल, दरम्यान, काही उत्सुक नागरिकांनी ओंकारला पाहण्यासाठी गदीं केली. काहींनी तर त्याला केळी व केळीची पानेही खायला दिली.

महाराष्ट्रातून सुटका, मात्र गोव्यात चिंता !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६३ दिवस वैमान घालल्यानंतर ओंकार हत्तीने गोव्यात प्रवेश केल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुस्कारा सोडला, तर गोव्यातील शेतकन्यांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिंधुदुर्गात असताना अनेकांनी त्याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. शेतकऱ्यांचे नुकसान, विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि नागरिकांची गर्दी यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनत आहे. ओंकारचा सुरक्षित व नियंत्रित बंदोबस्त करून परिसराला दिलासा देणे ही वन खात्याची तातडीची गरज आहे.

मागील दोन महिन्यांपासून ओंकार हत्ती सिंधुदुर्गात दहशत माजवत होता. महाराष्ट्र वन खात्याला त्याचा बंदोबस्त करता आला नाही. गोवा सरकारने आता तरी गांभीर्याने पावले उचलावीत. स्थानिक शेतकन्यांमध्ये प्रचंड नाराजी असून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. - उत्तम वीर, उपसरपंच (तोरसे)

शाळेला जाण्याची तयारी करत असतानाच 'ओंकार आला' अशी आरोळी झाली. रस्त्याच्या कडेला ओंकार बसलेला दिसला. कोणालाही इजा न करता तो बागायतीकडे निघून गेला. त्यामुळे आम्हाला शाळेत न जाण्याचा सत्ला देण्यात आला. - प्रेम तोरस्कर, विद्यार्थी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Verna Accident: हृदयद्रावक! बसने दिली धडक, दुचाकीने घेतला पेट; बेळगावच्या तरुणाचा गोव्यात होरपळून मृत्यू

Vijay Hazare Trophy: सलग दुसरे शतक, 14 वेळा चेंडू सीमापार! ललितच्या कारनाम्यामुळे गोव्याची घोडदौड; सिक्कीम पराभूत

ड्रग्जप्रकरणी 11 वर्षे गोव्याच्या तुरुंगात असणारा, 1 वर्षे भोगणार पोर्तुगालचा कारावास; काय आहे प्रकरण? जाणून घ्या..

Mungul Crime: गोव्याला हादरवून सोडणारे टोळीयुद्ध! 'मुंगूल गँगवॉर' प्रकरणातील सर्व संशयित जामीनमुक्त

Goa AAP: ‘आप’मध्‍ये उफाळला संघर्ष! स्थानिक नेते, संतप्त कार्यकर्त्यांचा 'आतिशीं'वर रोष; ‘2 तासांत पुन्हा येते’ म्हणून सोडली बैठक

SCROLL FOR NEXT