Omkar Elephant Update Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: कधी इकडे, कधी तिकडे! ओंकार पुन्हा तोरसेत; सिंधुदुर्ग वन कर्मचाऱ्यांनी हुसकावले

Omkar Elephant Update: ‘ओंकार’ हत्तीला सिंधुदुर्ग वन खात्याचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी एकत्र येऊन परत गोव्याच्या हद्दीत हाकलून लावल्याने हा हत्ती तोरसे येथे पोहोचला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पेडणे: डिंगणे - सिंधुदुर्ग येथे गेलेल्या ‘ओंकार’ हत्तीला सिंधुदुर्ग वन खात्याचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी एकत्र येऊन परत गोव्याच्या हद्दीत हाकलून लावल्याने हा हत्ती तोरसे येथे पोहोचला आहे. तोरसे येथील रानात सध्या तो स्थिरावला आहे.

४ एप्रिल रोजी मध्यरात्री महाराष्ट्राच्या नेतर्डे गावातून ओंकार हत्ती गोव्याच्या हद्दीतील कडशी - मोपा येथे आला होता. त्यानंतर गेला आठवडाभर मोपा गावाच्या वेगवेगळ्या भागातील रानात फिरत होता. यादरम्यान कडशी-मोपा येथे या हत्तीने दोन वाहनांची मोडतोड केली होती.

त्यानंतर गुरुवार ९ एप्रिल रोजी संध्याकाळी या हत्तीने गोवा महाराष्ट्र हद्दीवरील डिंगणे - सिंधुदुर्ग गावात प्रवेश केला होता. यामुळे पेडणे वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता; पण परत रविवारी रात्री महाराष्ट्राच्या हद्दीवरील लोक व सिंधुदुर्ग वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या हत्तीला परत गोव्याच्या हद्दीत हुसकावून लावल्यामुळे या हत्तीचे आता काय करावे, असा मोठा गहन प्रश्न पेडणे वन कार्यालयापुढे उभा राहिलेला आहे.

गोवा हातावर हात ठेवून; पलीकडून दगड, लाठ्या-काठ्या

या हत्तीला गोव्याच्या हद्दीत पिटाळून लावण्यासाठी सिंधुदुर्ग वन खात्याच्या कर्मचाऱ्यांसोबत गाळेली, नेतर्डे भागातील सुमारे ५० लोक सोबत लाट्या काठ्या मशाली घेऊन होते असे समजते. गोवा महाराष्ट्र हद्दीवरील लोकांनी या हत्तीला आल्या वाटेने परत जाऊ न देता परत गोव्याच्या हद्दीत पिटाळून लावण्याच्या स्वीकारलेल्या आडमुठ्या धोरणामुळे पेडणे वन खात्याचे कर्मचारी हतबल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT