Omkar Elephant Latest News Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: कवाथे-केळी फस्त, वाहनांची तोडफोड! 'ओंकार'चा धुमाकूळ; नागरिकांचा आंदोलन छेडण्याचा इशारा Video

Omkar Elephant Goa: तीन दिवस ओंकार हत्तीने उगवे परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर बुधवारी (ता.३) रात्री निगळये-पोरस्कडे परिसरात येऊन कवाथे, केळी फस्त करण्यास सुरुवात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: तीन दिवस ओंकार हत्तीने उगवे परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर बुधवारी (ता.३) रात्री निगळये-पोरस्कडे परिसरात येऊन कवाथे, केळी फस्त करण्यास सुरुवात केली.

वन खात्याचे कर्मचारी हवालदिल बनले असून केवळ हातात मशाली व सुताचे बॉम्ब घेऊन मागे फिरण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत. सरकारी यंत्रणा या हत्तीचा बंदोबस्त करण्यास कुचकामी ठरली आहे. त्यामुळे नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, ओंकार हत्तीने बागायतींची नासधूस करण्याबरोबरच आता वाहनांचीही तोडफोड करायला सुरुवात केली आहे. मंगळवारी त्याने तीन वाहनांची तोडफोड केली होती तर बुधवारी पहाटे एका चारचाकी वाहनाची तोडफोड केली आहे.

सरकारनेही अजूनपर्यंत प्रशिक्षित हत्तींची टीम आणण्यासाठी हालचाली सुरू न केल्यामुळे ओमकार हत्ती दिवसा पोटभर खाल्ल्यानंतर घनदाट जंगलात जाऊन वास्तव्य करतो आणि सूर्य मावळतीकडे आल्यानंतर तो गुपचूप पणे लोक वस्तीमध्ये प्रवेश करत आहेत, या ठिकाणी कवाथे पोफळी याची नासधूस सुरूच ठेवली आहे. शिवाय आता ओंकार हत्तीने वाहनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केलेली आहे.

या ओंकार हत्तीचा जर वेळेत बंदोबस्त वन खात्याने आणि सरकारने केला नाही. तर उगवेवासीयांनी रस्त्यावर येऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

किती नुकसान सोसायचे?

तिसऱ्याही दिवशी ओंकार हत्तीने उगवे परिसरात ठाण मांडून नासधूस करायला सुरुवात केली. अधिकाऱ्यांची या ओंकार हत्तीने झोप उडवलेली आहे. सरकारची यंत्रणा कूचकामी ठरलेली आहे. त्यामुळे अजून किती नुकसान सहन करायचे, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

सरकारी यंत्रणा ठरतेय कुचकामी

दरम्यान, ओंकार हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी वन खात्याकडे कोणतीच यंत्रणा नसल्याने वन खात्याचे कर्मचारी केवळ हातात सुताचे बॉम्ब आणि मशाली घेऊन हत्ती जातो कुठे, काय करतो, कुठे वास्तव्य करून राहतो हे दुरून पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Revoda Fire: AC मध्ये झाले शॉर्टसर्किट, फ्लॅटला लागली आग; 6 लाखांचे नुकसान, 2 युवती जखमी Video

Goa Today Live Updates: भाजपला मोठा धक्का! बाबू आजगावकर यांचा तोरसे झेडपी निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Bhoma: 'भोममधील मंदिरांची हानी होणार नाही'! मंत्री नितीन गडकरींचे स्पष्टीकरण; लोकसभेत कॅ. विरियातोंनी विचारला प्रश्‍‍न

लग्नाचे आश्वासन देऊन महिलेशी केली मैत्री, लैंगिक अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी; वडिल, मुलाचा फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

Harbhajan Singh: "मोहम्मद शमी कुठेय?" टीम इंडियाच्या सिलेक्शनवर हरभजन सिंह संतापला; गंभीर-आगरकर यांच्यावर उठवली टीकेची झोड!

SCROLL FOR NEXT