ओमिक्रॉनमुळे गोव्यातील शाळा पुन्हा बंद होणार?

 

Dainik Gomantak

गोवा

ओमिक्रॉनमुळे गोव्यातील शाळा पुन्हा बंद होणार?

मागील काही दिवसांपासून देशभरातील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. पण ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गोव्यात पुन्हा लॉकडाउन होणार का अशी शंका आता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: 2019 पासून संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले होते. ज्या संकटाची कल्पनाही कुणाला नव्हती असे जागतिक संकट सर्वांसमोर उभे राहिले. या कालावधीत शाळा - महाविद्यालये, ऑफिसेस, सार्वजनिक स्थळे अशी सर्वच ठिकाणे बंद करण्यात आली होती. पण जसजसे हे संकट आणि रुग्णसंख्या कमी होऊ लागली तसे देशभरात अनलॉकही होऊ लागले.

आता कुठे आयुष्य पूर्ववत होत आहे असे वाटत असतानाच पुन्हा ‘ओमिक्रॉन’ नावाचं नवीन संकट आपल्यासमोर आलं आहे. मध्यंतरीपासून अनलॉकमध्ये (Unlock) शाळा - महाविद्यालये आणि ऑफिसेस सुरू झाली आहेत. जवळजवळ दोन वर्ष विद्यार्थी शाळेत गेले नव्हते. ऑनलाईन शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते. पण मागील काही दिवसांपासून देशभरातील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. पण ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) पार्श्वभूमीवर गोव्यात पुन्हा लॉकडाउन (Lockdown) होणार का अशी शंका आता वर्तवली जात आहे.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, आता पुन्हा शाळा बंद करणे अयोग्य होईल. यावरच दुसरीकडे पालक आणि विद्यार्थी मात्र संभ्रमात दिसत आहेत. कोरोनाची धास्ती घेतलेल्या पालकांना याबाबत काय निर्णय घ्यावा हेच कळत नाही. जर आपल्या मुलांना ओमिक्रॉनची लागण झाली आणि जर त्यांचे आरोग्य धोक्यात आले, तर याची जबाबदारी गोवा सरकार घेणार का? असा सूर आता पालकवर्गातून उमटताना दिसत आहे.

या एकंदरीत परिस्थितीवर मुख्यमंत्री (CM Pramod Sawant) नेमका काय निर्णय घेणार आहेत, किंवा ही परिस्थिति ते कशा पद्धतीने हाताळणार आहेत, यावर आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT