Goa Omicron Variant 

 

Dainik Gomantak

गोवा

Goa Corona Updates: गोव्यात आणखी 6 जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती

Shreya Dewalkar

गोवा (Goa Omicron Update): राज्यातील आणखी सहा नमुने ओमिक्रॉनसाठी पॉझिटिव्ह आले असून, एकूण रुग्णांची संख्या 11 झाली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ट्विट करून दिली आहे, या सहाही रुग्णांची पुष्टी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), पुणे यांनी केली आहे. सर्व सहाही युनायटेड किंगडम (यूके) मधील प्रवासी असून त्यांना कोणतीही लक्षणे नाही आहेत. (Goa Corona Latest News updates)

ओमिक्रॉन ह्या कोरोनाच्या (Corona) नव्या प्रकारामुळे संगळ्यांवरच संक्रमणाची टांगती तलवार होती. यातच गेल्या काही दिवसांमध्ये गोव्यात ओमिक्रॉनचा (Omicron Variant) पहिला रुग्ण आढळला होता. पण तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

ब्रिटनमधून 17 डिसेंबर रोजी गोव्यात (Omicron Case In Goa) दाखल झालेल्या 8 वर्षीय मुलाचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. 27 डिसेंबर रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह (Omicron Positive) आला होता. त्यामुळे गोव्यात संक्रमण वाढणार की काय अशी भीती गोव्यातील नागरिकांना वाटत होती. त्यातच काल एकूण 6 नमुने ओमिक्रॉनसाठी पॉझिटिव्ह आले असून आता राज्यात चिंतेचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT