Bhago Bhairo varak Dainik Gomantak
गोवा

Bhago Varak Passed Away : गोव्यातील सर्वात ज्येष्ठ पंच भागो भैरो वरक यांचं निधन

डिचोली तालुक्यातील म्हावळिंगे पंचायतीच्या निवडणुकीत भागो वरक यांनी सर्वात ज्येष्ठ पंच म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Bhago Varak Passed Away : सर्वात ज्येष्ठ पंच होण्याचा मान मिळवलेल्या भागो वरक यांचं निधन झालं आहे. डिचोली तालुक्यातील म्हावळिंगे पंचायतीच्या निवडणुकीत भागो वरक यांनी सर्वात ज्येष्ठ पंच म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला होता. पंच म्हणून निवडून आल्यानंतर दोन महिन्यामध्येच त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे.

डिचोली तालुक्यातील काही पंचायतींचा धक्कादायक निकाल लागला होता. या पंचायत निवडणुकीच्या निकालात वन-म्हावळिंगे पंचायतींतून 82 वर्षांची ‘पगडी’ भारी ठरली होती. पंचायतीच्या प्रभाग सहामधून ‘पगडी’ या टोपणनावाने परिचित असलेले 82 वर्षांचे वृद्ध भागो भैरो वरक हे विजयी झाले होते.

भागो वरक यांच्या विरोधात अन्य तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भागो यांना दोनशे तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी शाहू वरक यांना 149 मते मिळाली. भागो वरक हे तब्बल 50 मतांनी विजयी झाले. दरम्यान, निवडून आल्यानंतर भागो वरक यांनी आपल्या समर्थकांसमवेत विजयोत्सवही साजरा केला होता. डिचोली तालुक्यात निवडून आलेल्या पंचसदस्यांपैकी ते सगळ्यात ज्येष्ठ पंच ठरले होते.

धनगर समाजातील नेते असलेले भागो वरक हे विशिष्ट पद्धतीच्या ‘पगडी’ मुळे प्रकाशझोतात असायचे. त्यांच्या डोक्यावर कायम पगडी असायची. केवळ डिचोलीतच नव्हे, तर बहूतेक भागात ते ‘पगडी’ या नावानेच परिचित होते. 1998 साली झालेल्या पंचायत निवडणुकीत ते वन-म्हावळींगे पंचायतीवर निवडून आले होते. मात्र, नंतर ते पंचायत राजकारणापासून अलिप्त होते.

दरम्यान आपण केलेली कामे पाहून धनगर बांधवांसह अन्य मतदारांनी पुन्हा निवडणूक लढविण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळेच निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. पंच असताना आपल्या प्रभागाचा केलेला विकास सर्वांच्या नजरेत आहे. त्यामुळेच मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले होते. आपण पंचायतीच्या विकासासाठी कार्यरत राहू, असा विश्वास भागो वरक यांनी व्यक्त केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT