पणजी: 'ओल्ड वाईन इन न्यू बॉटल', अशा शब्दात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांच्या शपथविधीवर टीका केली. २००७ ते २०१२ या काळात भाजपने टीका केलेल्या काँग्रेस सरकारमधील सात मंत्री आताच्या भाजप सरकारमध्ये असून, काहीच नवीन नाही, असे विजय सरदेसाई म्हणाले.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी सभापती रमेश तवडकरांनी आज (२१ ऑगस्ट) राजभवन येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळातील फेरबदल अखेर पार पडला.
मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी रमेश तवडकरांनी विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला. तर, बुधवारी पर्यावरण, कायदा आणि बंदर कप्तान खात्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राज्यपाल पुसापती राजू यांनी तवडकर आणि कामतांना मंत्रिपदाची शपथ दिली.
नव्या मंत्र्यांच्या शपथविधीवर आमदार विजय सरदेसाई यांनी टीका केली आहे."दिगंबर कामत एकदाचे मंत्री झाले, गेल्या तीन वर्षापासून आम्ही ते मंत्री होतील असे ऐकत आलो त्याला अखेर मूहुर्त लागला. पण, याचा सारंश काढला तर काय लक्षात येते? तर २००७ ते २०१२ दरम्यान, घोटाळेबाज सरकार म्हणून भाजच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठी आंदोलने केली, त्याच सरकारमधील सात मंत्री आताच्या देखील सरकारमध्ये (प्रमोद सावंत) आहेत," असे विजय सरदेसाई म्हणाले.
"दिगंबर कामत, विश्वजीत राणे, बाबुश मोन्सेरात, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, नीळकंठ हळर्णकर आणि मॉविन गुदिन्हो हे २००७ ते २०१२ या काळात काँग्रेसच्या सरकारमध्ये होते आणि आता भाजपच्या सरकारमध्ये देखील आहेत. याचा अर्थ १२ मंत्र्यांमध्ये दिगंबर कामतांची मेजॉरिटी आहे.
म्हणजेच २०१२ मध्ये ज्या भाजप कार्यकर्त्यांनी मोठमोठी आंदोलनं करुन परिवर्तनाचे भाजपचे सरकार आणले त्यांना काय संदेश आपण देत आहोत तर, रेस्ट ईन पीस! सुशेगाद राहा, काहीच करु नका," असे सरदेसाई म्हणाले.
या सर्व परिस्थितीकडे बघितल्यास एक लक्षात येईल की परिवर्तन वैगेरे काही झाले नाही. 'ओल्ड वाईन इन न्यू बॉटल', अशा शब्दात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी नव्या मंत्र्यांच्या शपथविधीवर टीका केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.