old Portuguese-era structure Dainik Gomantak
गोवा

धोकादायक इमारती हटवा; गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाची शिफारस

काणकोणात सर्वेक्षण

दैनिक गोमन्तक

चावडी येथील एक पोर्तुगीजकालीन इमारत धोकादायक स्थितीत असून ती मोडून काढण्याची शिफारस गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारत मजबूतीसंदर्भातील पथकाने दिलेल्या अहवालात केली आहे. येथे आणखी चार इमारती धोकादायक स्थितीत आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यांच्याविषयीही निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी सांगितले.

या पथकात अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. गणेश हेगडे आणि प्रो.गुरूवेंद्र वेळीप यांचा समावेश होता. ही इमारत चावडी येथे भर बाजारात असून ती इमारत १९२८ साली बांधली होती. या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या इमारतीत काही दुकाने आहेत.

अभियांत्रिकी पथकाने कळविले की, या इमारतीत वास्तव्य वा अन्य व्यवहार करणे धोकादायक आहे. या इमारतीच्या मजबूतीसंदर्भात पाहणी करून अहवाल देण्यासाठी पालिकेने २९ मे रोजी अभियांत्रिकी महाविद्यालयाला पत्र लिहिले होते. त्यासंदर्भात २० जूनला शंकर नाईक यांनी माहिती अधिकाराखाली अहवालाची मागणी केल्यानंतर पालिकेने या अहवालाची प्रत नाईक यांना दिली.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चावडी येथील शंकर नाईक आणि रामकृष्ण नाईक यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन या इमारती धोकादायक असल्याने त्या पाडण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार काणकोण उपजिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या इमारतीची पाहणी करून अहवाल दिला.

त्यानुसार पालिकेने या जुन्या इमारतीची पाहणी करून इमारतीच्या मजबूतीसंदर्भातील अहवाल देण्यासंबंधीचे पत्र ५ मे रोजी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पाठविले होते.

दुर्घटनेची टांगती तलवार

धोकादायक इमारतींच्या यादीत परशुराम रघुनाथ प्रभू बिल्डिंग, दामोदर नारायण प्रभू बिल्डिंग, नागेश दामोदर प्रभू बिल्डिंग, म्युनिसिपल रेसिडेंसियल कम कमर्शियल बिल्डिंग आणि शंकर नाईक यांच्या इमारतीचा समावेश आहे. यापैकी काही इमारती पोर्तुगीजकालीन असून त्यांचे काही भाग कोसळले आहेत.

काही इमारतींना टेकू लावले आहेत. यापैकी काही इमारती मडगाव -कारवार हमरस्त्यालगत असल्याने त्या कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

"काणकोण पालिका क्षेत्रातील पाच धोकादायक इमारतींसंदर्भात अभियांत्रिकी महाविद्यालयाला अहवाल देण्यासाठी पत्र दिले होते. एका इमारतीचा अहवाल मिळाला आहे. उर्वरित इमारतींचा अहवाल आल्यानंतर संबंधित मालकांना धोकादायक इमारत मोडून काढण्यासाठी नोटीस देण्यात येईल. दिलेल्या मुदतीत इमारती न मोडल्यास त्यांचा वापर करण्यास बंदी घालण्यात येईल."

- रमाकांत नाईक गावकर, नगराध्यक्ष, काणकोण.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT