St. Xavier Fest 2023:  Dainik Gomantak
गोवा

St. Xavier Fest 2023: सेंट झेवियर फेस्तासाठी जुने गोवे सज्ज

St. Xavier Fest 2023: कडक पोलिस बंदोबस्त: पहाटे चार वाजल्यापासून प्रार्थनांना सुरवात

दैनिक गोमन्तक

St. Xavier Fest 2023: सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त उद्या सोमवारी ४ डिसेंबर रोजी होणार आहे. दरवर्षी फेस्त 3 डिसेंबर रोजी साजरे केले जाते, परंतु रविवार आल्याने ते उद्या साजरे केले जाईल. सकाळी 10.30 वा. मुख्य प्रार्थना होणार असून त्याला विशेष अतिथी फादर सेबेस्त्यांव मास्कारेन्हस असणार आहेत.

गोवा, दमण आणि दीवचे आर्चबिशप फिलीप नेरी कार्डिनल फेर्रांव यावेळी उपस्थित राहणार आहेत. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त जगप्रसिद्ध असल्याने मोठ्या संख्येने देश – विदेशातून भाविक येतात. तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात आणि इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यात काहीजण वारीप्रमाणे चालून येण्याचीही प्रथा आहे.

मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले असून वाहतूक व्यवस्थेवर देखील भर दिला गेला आहे. मोठ्या संख्येने भाविक असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली असल्याने चुकीच्या दिशेन वाहने येणार नाही आणि पार्क केली जाणार नाहीत याची विशेष काळजी घेतली गेली आहे.

मुख्य प्रार्थनेला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

पहाटे 4 वाजल्यापासून प्रार्थना सुरू होणार असून प्रत्येक तासाला सकाळी 9 पर्यंत त्या चालणार आहेत. त्यानंतर 10.30 वाजता मुख्य प्रार्थना होणार आहे. या प्रार्थनेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित असणार आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेकडून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT