Goa Accident Case: धक्कादायक! ...आठवड्यात 50 अपघातांची नोंद; 8 बळी

Goa Accident Case: मृत्‍यूंचे प्रमाण 8 टक्‍क्‍यांनी वाढले : किनारी भागात वाहने चालवणे धोकादायक
Accident Cases in Goa
Accident Cases in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Case: राज्यात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांची संख्या वाढण्याबरोबरच त्यामध्ये मृत्यू होण्याच्या घटनाही वाढत आहेत.

वर्ष संपण्यास एक महिना बाकी असताना आतापर्यंत 259 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे, तर 2700 हून अधिक रस्ते अपघातांची नोंद झाली आहे.

Accident Cases in Goa
Mhadai River: सहा डिसेंबरला म्हादईप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

2022 च्या तुलनेत 2023 मध्ये अपघातांचे प्रमाण 5 टक्क्यांहून कमी झाले असले तरी अपघाती मृत्यूंचे प्रमाण 8 टक्क्यांनी वाढले आहे, ही चिंतेची बाब आहे. रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व वाहतूक पोलिसांकडून अधूनमधून विशेष मोहीम राबवूनही त्यात काहीच सुधारणा होत नाही.

दंडात्मक कारवाईतून अडीचपट महसूल जमा झाला आहे. गेल्या आठवडाभरात किरकोळ व भीषण मिळून ५० च्या आसपास अपघात नोंद झाले असून त्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघात घटले, मृत्यू वाढले

दिवसेंदिवस ही समस्या कमी होण्याऐवजी अधिकच जटिल होत चालली आहे. हे अपघात पर्यटक वा चालकांच्या चुकीमुळे होत असून ते रात्रीच्यावेळी मद्यधुंद अवस्थेत किंवा ड्रग्सचे सेवन केल्याने झाले आहेत.

हणजूण येथे हॉटेलची मालकीण बाहेर उभी असताना पर्यटक चालकाने थेट गाडी हॉटेलच्या रिसेप्शनपर्यंत घुसवली होती. शनिवारी पहाटे हडफडेत विदेशी पर्यटकाने मागून धडक देऊन तिघांचा जीव घेतला होता.

वाहतूक पोलिसांतर्फे विशेष मोहीम सुरूच आहेत. रात्री किनारपट्टी भागात पर्यटकांची मद्यचाचणी करण्याचे काम पोलिसांकडून केले जाते. संशयास्पद आढळून येणाऱ्या चालकांची चाचणी केली जाते. पुलाच्या ठिकाणी किंवा राष्ट्रीय महामार्गावर स्पीड रडारने वेगावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. चालकांनीही स्वतःची जबाबदारी म्हणून कायद्याचे पालन करावे.

- अक्षत कौशल, वाहतूक पोलिस अधीक्षक. (आयपीएस)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com