Old Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Old Goa Accident: अपघातांची मालिका काही थांबेना, ओल्ड गोव्यात कार-दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

two dead in old goa accident: राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, रस्त्यांवरील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sameer Amunekar

पणजी : राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, रस्त्यांवरील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशाच एका भीषण अपघाताची नोंद ओल्ड गोवा येथे झाली आहे. शुक्रवारी (१९ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास कार आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ओल्ड गोव्यातील परिसरात ही दुर्घटना घडली. कार प्रचंड वेगात असल्यामुळे दुचाकीस्वारांना वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला असून दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया सुरू केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, वाहनं बाजूला करून रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

नागरिकांकडून रस्त्यांवरील वेगमर्यादा पाळण्याबाबत आणि सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तो लहान मुलगा नाही, तो एक वादळ आहे!" WWEच्या रिंगणात वैभव सूर्यवंशीची दहशत! दिग्गज फायटरने टेकले गुडघे Watch Video

Illegal Cattle Slaughter Goa: सुरावलीत गुपचूप चालली होती जनावरांची बेकायदेशीर कत्तल, कर्नाटकच्या दोघांना रंगेहाथ पकडलं; गोवा पोलिसांची धडक कारवाई

Goa Ranji Cricket Team: गोव्याच्या रणजी संघ प्रशिक्षकपदी नवा चेहरा? जीसीए विचाराधीन; मागील 5 क्रिकेट मोसमांत बदलाची परंपरा

Goa Cashew Production: शेतकऱ्यांकडून 'काजूबिया' खरेदी बंद, बागायतदार संकटात; काजू उत्पादनात 40 टक्के घट

Goa Cash For Jobs Scam: निवृत्त पोलिसालाच 10 लाखांचा चुना! मुलाला 'PSI' बनवण्याच्या नावाखाली फसवणूक; फोंड्यात दोघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT