विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election 2022) घोषणा झालेली नसली तरी पडघम सुरू झाले आहेत. यंदांची गणेशचतुर्थी (Ganesh Chaturthi) तर लक्ष्मीच्या पावलांनी भरलेल्या धान्याच्या कोठारांनी आली आहे. पीठ, मीठ, डाळ, वाटाणे, मूग, नारळ, गुळाच्या पिशव्या आहेतच शिवाय तेला, तुपाची धारही मतदारांवर धरली जात आहे.
चतुर्थीची भेट म्हणून दिलेल्या पिशव्यांवर पक्षाची, लोकप्रतिनिधींची छायाचित्रे नसल्यास कसे चालेल? त्यांचे चतुर्थीत दर्शन हवेच. मुख्य पिशवीवरील छायाचित्र राहू द्या बाजूला, पेडणेकरांना (Pernem) म्हणे बाबू ब्रॅण्डची बाटलीही (Babu brand oil bottle) पोचली आहे. बाबू कोण? बाटली कसली? गैरसमज नको, बाटल्या तेलाच्या आहेत, त्यावर दोन्ही हात जोडलेल्या जॅकेट घातलेल्या उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकरांचे (Babu Ajgaonkar) छायाचित्र आहे कमळ चिन्हासह (BJP).
गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा त्याही दणदणीत इंग्रजीतून, आहे की नाही बाबूंच्या बाटलीची कमाल. धमाल तर पुढे आहे या तेलाचा वापर स्वयंपाकासाठी करायचा की डोक्यावरील टक्कलावर ते रामबाण आहे? तेलाची बाटली स्वीकारा, बाबू गेले तेल लावत असा सल्लाही देणारे आहेत.
दरम्यान येणारी विधानसभेची निवडणूक (Assembly Elections) ही बेरोजगारीचा प्रश्न सोडवणारी असणार आहे. जे विविध प्रकल्प होवू घातले आहेत त्यातून जी रोजगाराची निर्मिती होणार आहे त्या सर्व नोकऱ्या पेडणे मतदार संघातील युवकांना मिळणार आहे आणि निवडणुका झाल्यानंतर मतदार संघातील एकही युवक बेरोजगार उरणार नाही असा दावा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांनी इब्रामपूर येथे झालेल्या श्री सातेरी मंदिर परिसराचा कामाचा शुभारंभ करताना केला होता.
निवडणुका जवळ आल्या कि पावसात जशी अळंबी उगवतात त्याच पद्धतीने काहीजण निवडणुका जवळ आल्या कि एकाध्या नागरिकांच्या झोपडीला दोन चार पत्रे घालून देतो आणि आपण त्याला घर बांधून दिले अशी प्रसिद्धी मिळवतो, अश्या खोटी माहिती पुरवणाऱ्या नेत्यांचा जनतेने समाचार घ्यावा, त्याना जाब विचारावी असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले होते. आता या बाटल्या वाटण्यावरून पेडणेकर बाबू आजगावकरांना जाव विचारणार का? आणि आजगावकर पेडणेकरांना उत्तर देणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.