Goa Assembly Elections: काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे राष्ट्रवादी पेचात

कॉंग्रेसमधून (Congress) फुटून भाजपमध्ये (BJP) दाखल झालेल्या त्या १० फुटीर आमदारांना (MLA) प्रवेश देणार नाही, असे कॉंग्रेसने जाहीर केले आहे
Representative image
Representative imageDainik Gomantak

गोव्यात पुढच्या वर्षी निवडणुका आहेत (Goa Assembly Elections). कॉंग्रेसमधून (Congress) फुटून भाजपमध्ये (BJP) दाखल झालेल्या त्या १० फुटीर आमदारांना (MLA) प्रवेश देणार नाही, असे कॉंग्रेसने जाहीर केले असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही (NCP) त्यांना पक्षात घेऊ नये, असा दबाव कॉंग्रेसचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसकडून युती करण्याचे नाव नाही. (Goa Assembly Elections: Congress yet to alliance with other parties)

Representative image
मये भाजप किसान मोर्चा अध्यक्षपदी दिनानाथ गावकर यांची नियुक्ती

उलट फुटीर आमदारांना पक्षात घ्यायचे म्हटले तरी अडवणूक करायची, या कॉंग्रेसच्या आडमुठ्या धोरणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पेचात सापडला आहे. त्या फुटीर १० आमदारांपैकी ज्या दोन ते तीन आमदारांना भाजपच्या उमेदवारीवर निवडून येणे शक्य वाटत नाही, ते राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊ इच्छीतात. मात्र त्यांना राष्ट्रवादीने घेऊ नये, अशी अट वजा इशारा कॉंग्रेसने दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने एवढ्या विनंत्या करूनही कॉंग्रेसचे नेते युती करण्यास पुढे येत नाहीत. तसेच त्या फुटीर आमदारांनाही प्रवेश देण्यास मज्जाव करत असल्याची भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पसरली आहे.

कॉंग्रेसने युती करावी, यासाठी राष्ट्रवादीचे नेते अगतिक झाले आहेत. कारण पक्षाचे अस्तित्व राखायचे असेल तर कॉंग्रेससोबत युती हवीच. महाराष्ट्रात ती आहे. मात्र, कॉंग्रेसचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विनंत्यांकडे दुर्लक्ष करून पक्ष बळकट करण्यात गुंतले आहेत. राष्ट्रवादी आणि गोवा फॉरवर्ड यांना कॉंग्रेससोबत युती झाल्यास लाभ आहे.

Representative image
Travelling to Goa? वाचा काय आहेत नवीन नियम

त्यामुळेच ते वारंवार कॉंग्रेसला युतीसाठी अल्टीमेटम देत आहेत. तर कॉंग्रेसने या दोन्ही पक्षांना झुलवत ठेवण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची गोची झाली आहे.

मिकींमुळे चर्चिलचे धाबे दणाणले

सध्या या पक्षाकडे बाणावली हा एकमेव मतदारसंघ आहे. तेथे कॉंग्रेसतर्फे माजी मंत्री मिकी पाशेको लढण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे बाणावलीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांना नाही म्हटले तरी धडकी भरली आहे. कारण कॉंग्रेसने बाणावलीत उमेदवार उभा केला तर ही जागा राखणे त्यांना कठीण होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com