Officials of Book My Show who came to inspect the site for sunburn festival in Verna were surrounded by villagers  Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: वेर्ण्यात जागा शोधायला आले अन्‌ तावडीत सापडले; सनबर्न प्रकरणी 'बुक माय शो’च्या अधिकाऱ्यांना ग्रामस्‍थांचा घेराव

गोमन्तक डिजिटल टीम

सध्‍या राज्‍यात ‘सनबर्न’चा विषय गाजत आहे. दक्षिण गोव्‍यात या संगीत महोत्‍सवाला कडाडून विरोध होत आहे. त्‍यातच आज वेर्णा येथे ‘सनबर्न’साठी जागेची पाहणी करण्यास ‘बुक माय शो’चे अधिकारी आल्याच्या संशयावरून ग्रामस्‍थांनी त्‍यांना घेराव घालून जाब विचारला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर त्‍यांच्‍यासोबत होते. दरम्‍यान, यावेळी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

किटल-बेतूल येथील जागेत ‘सनबर्न’ महोत्सव आयोजित करण्यासाठीचा आयोजकांचा अर्ज औद्योगिक विकास महामंडळाने फेटाळल्याने वेर्णा पठारावर एखादी सुयोग्य जागेची पाहणी हे अधिकारी आले असावेत, असा ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही केवळ जागा पाहण्यासाठी आलो आहोत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, आम्ही कोणत्‍याही परिस्थितीत ‘सनबर्न’ वेर्णातच नव्हे तर दक्षिण गोव्यात कुठेही आयोजित करू देणार नाही. आम्ही येथे शांततेने जीवन जगत आहोत. त्यात आम्हाला खंड पडू द्यायचा नाही.

रोहन खंवटे-आलेक्‍स रेजिनाल्‍ड हेच जबाबदार

पर्यटनमंत्री रोहन खंवटे व गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना कोणत्‍याही परिस्थितीत ‘सनबर्न’ संगीत महोत्सव दक्षिण गोव्यात आयोजित करावयाचा आहे. ‘बुक माय शो’चे अधिकारी आज वेर्णा येथे जागेचा शोध घ्‍यायला आले असता पकडले गेले, असे ठाम मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

सरकारने अजून ‘सनबर्न’ महोत्सवासाठी परवानगी दिलेली नाही, मात्र आयोजकांनी त्‍याची तिकीटविक्रीही सुरू केली आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर खटला दाखल करावा. सरकार याबाबत काहीच करत नाही म्हणजेच ‘सनबर्न’ला सरकारचाही पाठिंबा असल्याचे स्पष्ट होते. -अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जुलूसवर कायमच्या बंदीची मागणी; गोव्यात हिंदू संघटनेच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक, म्हापशात तणाव

आमच्यासाठी 'शेतकरी' महत्त्वाचे आहेत! कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताहात आमदार फळदेसाईंचे प्रतिपादन

Goa Crime: विद्यार्थ्यांच्या भांडणात तिसरीतली विद्यार्थीनी गंभीर जखमी, अत्यवस्थ होऊनही शाळेचे दुर्लक्ष; पालक संतप्त

Sunburn Festival 2024: ‘आमका नाका सनबर्न’! गावपण टिकवण्यासाठी कामुर्लीत स्थानिक एकवटले

Bollywood Actress Alia Bhatt: हसमुख आलियाचा हॉट अंदाज चाहत्यांना मोहीनी घालतोय!

SCROLL FOR NEXT