Sunburn Festival: दक्षिण गोव्यात सनबर्न फेस्टिव्हल नकोच; बेताळभाटी ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर
Sunburn Festival Goa 2024Dainik Gomantak

Sunburn Festival: दक्षिण गोव्यात सनबर्न फेस्टिव्हल नकोच; बेताळभाटी ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर

Sunburn Festival Goa 2024: राज्यात सनबर्न फेस्टिव्हलच्या दक्षिण गोव्यातील आयोजनावरुन वातावरणं चागलंच तापलं आहे. विरोधक सनबर्नच्या आयोजनावरुन सत्ताधारी पक्षावर सडकून टिका करतायेत.
Published on

राज्यात सनबर्न फेस्टिव्हलच्या दक्षिण गोव्यातील आयोजनावरुन वातावरणं चागलंच तापलं आहे. विरोधक सनबर्नच्या आयोजनावरुन सत्ताधारी पक्षावर सडकून टिका करतायेत. दक्षिण गोव्यात ड्रग्ज संस्कृतीचा आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. दरवर्षी वागतोर येथे सनबर्न फेस्टिव्हल साजरा केला जातो. मात्र यावर्षी सनबर्नचे ठिकाण बदल्याने राजकारण चांगलेच तापले. यातच आता, बेताळभाटी ग्रामसभेत दक्षिण गोव्यातील सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सनबर्न फेस्टिव्हलचा मुद्दा उपस्थित होताच ग्रामसभेत उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी एकमताने कडाडून विरोध केला.

सनबर्न फेस्टिव्हलचे गोव्यात होणारे आयोजन फक्त ड्रग्ज सेवन करण्यासाठीच असते. त्यामुळे हा संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठीं कुठलीही परवानगी या आयोजकांना देण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते जना भंडारी यांनी मुख्य सचिवांना दिले होते.

Sunburn Festival: दक्षिण गोव्यात सनबर्न फेस्टिव्हल नकोच; बेताळभाटी ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर
Sunburn Festival: सनबर्न आयोजकांविरुद्ध ‘एफआयआर’ची मागणी; आश्र्विन चंद्रू यांना निवेदन

तर दुसरीकडे, दक्षिण गोव्यात सनबर्नचे आयोजन होणार हे सरकारने सोडलेले पिल्लू आहे, असे म्हणत गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता.

Sunburn Festival: दक्षिण गोव्यात सनबर्न फेस्टिव्हल नकोच; बेताळभाटी ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर
Sunburn Festival In Goa : गोव्यात सनबर्न महोत्सव होणार का ? स्थानिकांचा तीव्र विरोध

तसेच, वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा व बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी या महोत्सवाला आपला विरोध असून जे कोण या महोत्सवाला विरोध करतात त्यांना आपला पूर्ण पाठिंबाही जाहीर केला. क्रुझ सिल्वा यांनी सांगितले की, या महोत्सवामुळे उत्तर गोव्याची काय परिस्थिती झाली आहे हे आम्ही पाहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com